मुंबई : नवीन १५व्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. प्रचंड यशामुळेच महायुतीच्या आमदारांनी भगवे फेटे बांधून विधान भवनाच्या आवारात एकच जयजयकार केला. त्याच वेळी अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून लगावलेल्या कोपरखळीने उभयतांमधील संबंध किती ताणले गेले आहेत याचे प्रत्यंतर पुन्हा आले. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केलेल्या अभिनंदनाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अधिवेशनाला सुरुवात होण्यार्पू्वी महायुतीच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. भाजप आणि शिवसेनेचे आमदार भगवे फेटे बांधून आले होते. तर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांनी गुलाबी फेटे बांधले होते. विधान भवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सारे सदस्य सभागृहात जातील, असे नियोजन करण्यात आले होते. उपमुख्यंत्री अजित पवार यांचे विधान भवनात आगमन होताच ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिशेने जात असताना माजी मंत्री व भाजपचे ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांनी त्यांना थांबविले. ‘थांब, एकनाथ शिंदे येत आहेत’. त्यावर अजित पवार यांनी , अजून ते ‘वर्षा’ बंगल्यावर आहेत. शिंदे नेहमीसारखेच उशिरा येतील, असे सांगत शिंदे यांना चांगलीच कोपरखळी हाणली.
हेही वाचा >>>नागपूरच्या पालकमंत्रीपदावरून तर्कवितर्क
दुसरीकडे, पायऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे आमदार शिंदे यांच्या प्रतीक्षेत होते. त्याच वेळी शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आदित्य ठाकरे व सचिन अहिर यांचे आगमन झाले. आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांच्याशी हस्तांदोलन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे समोरासमोर आले. मविआच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला असला तरी दोन्ही नेत्यांच्या प्रत्यक्ष भेटीत महाराष्ट्राचे सुसंस्कृत राजकारण पुन्हा दिसले.
संस्कृतमधून शपथ
भाजपचे गिरीश महाजन यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. त्यावेळी सभागृहातील काही सदस्यांमध्ये कुजबुज सुरू असताना आपण आजवर सहा वेळा संस्कृतमधूनच शपथ घेतल्याचे महाजन यांनी सांगितले. सीमा हिरे, प्रताप अडसड, राम कदम, प्रशांत ठाकूर, नितेश राणे, सुधीर गाडगीळ यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. समाजवादी पक्षाचे आबू आझमी यांनी हिंदीतून, भाजपचे कुमार आयलानी यांनी सिंधी भाषेतून, एमएयएमचे मुफ्ती मोहम्मद यांनी ऊर्दूतून विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
हेही वाचा >>>“इंडिया आघाडी मी बनवलीय, संधी मिळाल्यास…”, ममता बॅनर्जी यांचं मोठं वक्तव्य; मित्रपक्षांच्या सावध प्रतिक्रिया
मतदारांपासून देवतांना स्मरून शपथ
छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, कोणी ईश्वर साक्षीने, कोणी अल्लाला स्मरून तर कोणी आपल्या मतदार संघातील मतदारांना स्मरून आमदारकीची शपथ घेतली. शिवसेनेच्या सदस्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने सदस्यत्वाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथ घेत असताना सत्ताधारी सदस्यांकडून ‘जय श्रीरामा’चा घोष करण्यात आला तर उपमुख्यमंत्री शिंदे शपथ घेत असताना ‘जय भवानी जय शिवाजी’चा नारा देण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार सदस्यत्वाची शपथ घेत असताना ‘एकच वादा, अजित दादा’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नीलेश राणे यांनी सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय शिवराय, जय नारायण’ चा नारा दिला. श्रीजया चव्हाण आणि महेश चौगुले यांनी पायातील वहाणा बाजूला ठेवून सदस्यत्वाची शपथ घेतली.
अन्य सदस्यांचा आधार
भाजपचे घाटकोपर पूर्व मतदार संघातील सदस्य पराग शहा व्हीलचेअरवरून सभागृहात आले. शपथविधीसाठी त्यांना मिहीर कोटेचा व अन्य एका सदस्याने आधार दिला. तर मंदा म्हात्रे, विश्वनाथ भोईर आदी सदस्यांनाही शपथविधीसाठी व्यासपीठावर जाताना सभागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आधार घ्यावा लागला.
भाजपचे रासने विरोधी बाकावर
विधानसभेतील सुमारे एक चर्तुर्थांश जागा सत्ताधाऱ्यांसाठी राखून ठेवल्या असून प्रथमच विधानसभेत प्रवेश केलेले अनेक आमदार गोंधळून गेले. विधानसभेत सर्व आमदारांच्या जागा निश्चित केल्या असल्या तरी कामकाजाची कल्पना नसल्याने अनेक आमदार आपली निश्चित जागा सोडून दुसऱ्याच्या जागेवर बसत होते. तर वरिष्ठ सदस्य त्यांना योग्य जागी बसण्यासाठी मार्गदर्शन करीत होते. तरीही भाजपचे कसबापेठ मतदार संघातील सदस्य हेमंत रासणे चक्क विरोधकांच्या बाकांवर बसले होते. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात येताच गोंधळलेल्या रासणे यांना सत्ताधाऱ्यांमध्ये आणून त्यांची जागा दाखविली. त्यावेळी सभागृहात हास्याची एकच खसखस पिकली.