नाशिक : आमदार आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून शिवसेना ठाकरे गटाने विधानसभेच्या अधिकाधिक जागांवर दावेदारी करण्याची रणनीती आखली आहे. गेल्यावेळी विधानसभेच्या ज्या जागा लढल्या नव्हत्या, त्यावरही लोकसभा निवडणुकीतील यशामुळे ठाकरे गटाचे लक्ष आहे. यातून नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी आठ मतदारसंघांवर दावा सांगितला गेल्याने महाविकास आघाडीत जागा वाटपावरून संघर्ष अटळ आहे.

राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेपाठोपाठ ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी देखील महाराष्ट्र स्वाभिमान सभा अभियान नाशिकपासून सुरु केले आहे. पहिल्या दिवशी ठाकरेंनी शहरात पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. दुसऱ्या दिवशी येवला येथे शेतकरी आणि मनमाडमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधला. येवला आणि नांदगाव हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने बंडखोरांचे मतदारसंघ. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे येवल्याचे तर, शिवसेना शिंदे गटात सर्वात आधी सहभागी झालेले आमदार सुहास कांदे हे नांदगावचे प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्र स्वाभिमान सभेसाठी नाशिक मध्यसह या उपरोक्त मतदारसंघाची जाणीवपूर्वक निवड करुन मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.

Viral Video Of Desi Jugaad
कामगाराला बाहेर काढण्यासाठी लावलं भन्नाट डोकं; Video तील जुगाड पाहून तुम्हीही म्हणाल, ‘चुकूनही देशाबाहेर… ‘
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Speed ​​Limit, Signal Violation, Accident, Nagpur,
तुम्हीही ‘सिग्नल’ तोडता का? मग ‘हे’ वाचाच, कारण वर्षभरात तब्बल….
Thackeray group on streets against bus fare hike protests at various places in nashik
बस भाडेवाढीविरोधात ठाकरे गट रस्त्यावर, जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन
दोनदा मुदतवाढीनंतर मनीष नगर रेल्वे भुयारी मार्ग खुला होणार
bmc commissioner bhushan gagrani express view about bmc fd
मुदतठेवींबाबत चिंता नाही! नियोजन न केल्यास मात्र आर्थिक चणचण, मुंबई पालिका आयुक्तांचा इशारा
Anand Anil Khode from Akola will lead commanding procession of All India NCC Parade in Delhi
अकोल्यातील आनंदचे दिल्लीमध्ये संचलनात नेतृत्व, सफाई कर्मचाऱ्याच्या मुलाचे नेत्रदिपक यश

हेही वाचा…Shakti Bill Update: बदलापूर प्रकरणानंतर शक्ती कायद्याची पुन्हा चर्चा; बलात्काऱ्यांना कडक शिक्षा देणारा कायदा का रखडला?

लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीने मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. त्यामुळे आघाडीतील तिन्ही पक्षांना आपली ताकद वाढल्याचे वाटत असून प्रत्येकाकडून विधानसभेच्या अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी चढाओढ सुरू आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभेत जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी तोच विषय मांडला. जिल्ह्यात ठाकरे गटाची मोठी ताकद आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत १५ पैकी किमान आठ जागा ठाकरे गटाला देण्याची मागणी त्यांनी केली. अर्थात यावर आदित्य यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

हेही वाचा… पिंपरीत भाजपमधील गटबाजीला उधाण

मात्र, सभेतून मित्रपक्षांना योग्य तो संदेश दिला गेला. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपशी युती करणाऱ्या एकसंघ शिवसेनेने देवळाली, सिन्नर, निफाड, नांदगाव, मालेगाव बाह्य, इगतपुरी, दिंडोरी आणि कळवण-सुरगाणा या आठ जागा लढविल्या होत्या. यातील केवळ मालेगाव बाह्य आणि नांदगाव या दोन ठिकाणी विजय मिळू शकला. पक्ष दुभंगल्यानंतर या मतदारसंघातील अनुक्रमे दादा भुसे आणि सुहास कांदे हे दोन्ही आमदार शिंदे गटात गेले. म्हणजे ठाकरे गटाचा सध्या जिल्ह्यात एकही आमदार नाही. तथापि, नाशिक लोकसभेत राजाभाऊ वाजेंच्या विजयाने समीकरणे बदलली. त्याचा पुरेपूर लाभ उठविण्याचे धोरण ठाकरे गटाने ठेवले आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेची सुरुवात गतवेळी काँग्रेसने लढविलेल्या नाशिक मध्य मतदारसंघातून झाल्याचे मानले जाते.

Story img Loader