छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात गृहमंत्री अमित शहा यांची सभा होत असली तरी या जागेवरील आपला दावा शिवसेनेनेही सोडला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीने या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटीलही इच्छुक आहेत. भाजपा किंवा शिवसेना कोणीही उमेदवारी दिली तर आपण निवडणुकीत उतरू अन्यथा अपक्ष निवडणूक लढविण्याचीही तयारी करत आहोत, असे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

२०१९ ची लोकसभा निवडणूक दोन स्तरावर झाली होती. धार्मिक ध्रुवीकरणाबरोबरच मराठा ओबीसी ध्रुवीकरणामुळे एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले. या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांना लक्षणीय मते मिळाली होती. मराठा आरक्षण मागणीच्या अनुषंगाने निघालेल्या ५२ मोर्च्यांच्या पार्श्वभूमीवर मराठा मतांचे ध्रुवीकरण करण्यात हर्षवर्धन जाधव यांना यश आले होते. विनोद पाटील यांची ओळख मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारा कार्यकर्ता अशी आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा बारकाईने अभ्यास ते माध्यमांमध्येही मांडत असत. आंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असताना विनोद पाटील यांनीही आपणही उमेदवार म्हणून इच्छुक आहोत, असे सांगितले आहे. हर्षवर्धन जाधव यांना मिळालेली दोन लाख ८३ हजार ७९८ मतांमुळे पुन्हा एकदा अधिकची बेरीज होऊ शकेल काय, याची चाचपणी केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर आतापर्यंत शिवसेनेचा पगडा होता. भाजप-सेना युतीत असताना सातवेळा या मतदारसंघात युतीला विजय मिळाला. दोन वेळा मोरेश्वर सावे, एकदा प्रदीप जैस्वाल आणि चारवेळा चंद्रकांत खैरे निवडून आले होते. मात्र, धर्म आणि जात या दुहेरी ध्रुवीकरणाच्या प्रयोगशाळेत इच्छुक उमेदवार म्हणून विनोद पाटील यांनी आपले नावही जोडले आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कशी आणि कुठे सरकेल याची गणिते मांडली जाऊ लागली आहेत. २०१९ मध्ये एकूण मतदानाच्या ३२.०५ मते एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना मिळाले होते. चंद्रकांत खैरे यांना ३२.०१ टक्के मतदान मिळाले होते. तर हर्षवर्धन जाधव यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी २३.०७ एवढी होती. येत्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदानाच्या ५० टक्के भाजपला मिळावीत, असे उद्दिष्ठ ठरविण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर या लोकसभा मतदारसंघात भाजपने स्वतंत्रपणे एकदाही निवडणूक लढविलेली नाही. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांची सभा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
Congress city presidents strength for rebellion in Thane
ठाण्यात बंडखोरीला काँग्रेस शहराध्यक्षांचे बळ?

हेही वाचा – शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या राजकारणाची तऱ्हाच न्यारी

गंगापूर, वैजापूर आणि कन्नड या तालुक्यांमध्ये मराठा मतदारांचे प्राबल्य अधिक आहे. आरक्षण आंदोलनामुळे हे मतदान एकगठ्ठा करता येईल का, अशी व्यूहरचना सत्ताधारी आणि इंडिया आघाडीतील पक्षांकडूनही केली जात आहे. विकासाच्या मुद्द्यांऐवजी धर्म आणि जात केंद्रित गणिते याची आखणी राजकीय पटलावरून सुरू झाली आहे.

हेही वाचा – मंत्री दादा भुसे यांच्या विरोधातील धुसफूस बाहेर

शिंदे गटाकडे सक्षम उमेदवाराची वानवा असल्याने विनोद पाटील यांना शिवसेनेमध्ये घ्यावे अशी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विनोद पाटील यांचे संबंधही चांगले आहेत. छत्रपती शिवाजी महराजांची जयंतीचा कार्यक्रम आग्रा येथील आयोजनात विनोद पाटील यांनी पुढाकार घेतला होता. भाजपऐवजी शिवसेनेकडे लोकसभेची जागा घ्यावी ही चर्चा पेरली जात आहे. भाजपमधून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मंत्री अतुल सावे हेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र, जागेचा तिढा कायम आहे.