MVA Alliance Future in Maharashtra Politics: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल विरोधकांप्रमाणेच सत्ताधाऱ्यांनाही आश्चर्य वाटायला लावणारे ठरले. एग्झिट पोलमध्ये महायुतीला निसटता विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण प्रत्यक्षात मतदारांनी भाजपाप्रणीत महायुतीच्या पारड्यात तब्बल २३५ जागांचं घवघवीत यश टाकलं. दुसरीकडे मविआमध्ये निकालांमुळे प्रचंड अस्वस्थता असल्याचं पाहायला मिळत आहे. अवघ्या ४९ जागांवर विरोधकांना समाधान मानावं लागल्यामुळे आता काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तिन्ही पक्षांकडून पराभवाची कारणमीमांसा आणि आगामी वाटचालीबाबत निर्णय या घडामोडींच्या दिशेनं राजकीय समीकरणं जाऊ लागल्याचं दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवावर सध्या महाविकास आघाडीमध्ये विचारमंथन चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. पण एकीकडे पक्षातील वरीष्ठ पराभवाची कारणं शोधण्यात व्यग्र असताना पक्षातून नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच सूर उमटू लागला आहे. अवघ्या काही महिन्यांत महाराष्ट्रात महानगर पालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, नगरपरिषदा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पण स्वतंत्र लढावं, असा सूर मविआतल्या दोन पक्षांमधून उमटू लागला आहे. पण तिसरा पक्ष मात्र अद्याप यावर मौन बाळगून आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
rss bjp tussle ends maharashtra vidhan sabha election 2024
वादावर पडदा, RSS भाजपासाठी मैदानात; विधानसभेसाठी यंत्रणा कार्यान्वित!
Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
maharashtra assembly election 2024 akot vidhan sabha constituency Prakash Bharsakale
अकोटमध्ये जातीय राजकारण कुणाच्या पथ्यावर?
Mehkar Assembly constituency shinde shiv sena thackeray shiv sena Siddharth Kharat Sanjay Raimulkar buldhana district
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?
maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले

नेमकं काय घडतंय महाविकास आघाडीमध्ये?

विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतंत्र लढण्याचा विचार बोलून दाखवला होता. त्याला आता काँग्रेसमधूनही दुजोरा मिळू लागला आहे. काँग्रेस नेते व माजी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्रीपदावरून सत्ताधारी महायुतीमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा रंगत असताना दुसरीकडे मविआमधील स्वतंत्र लढण्याचे सूर उघडपणे समोर येऊ लागले आहेत.

MVA Congress Meeting : राज्यात काँग्रेसची पीछेहाट, कारणं काय? भर बैठकीत खरगेंनी नेत्यांना सुनावलं!

m

विजय वडेट्टीवार यांनी स्वतंत्र लढण्याबाबत पक्षातून काहींनी मत व्यक्त केलं असलं, तरी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असं स्पष्ट केलं आहे. “आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण ही सगळी त्यांची वैयक्तिक मतं आहेत. ही पक्षाच अधिकृत भूमिका नाही. आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांचा आढावा घेत आहोत. त्यानंतर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पुढील वाटचालीबाबत निर्णय घेतला जाईल”, असं सूचक विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचं मात्र मौन

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षापाठोपाठ काँग्रेसमधूनही स्वतंत्र लढण्याचा सूर आळवला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून मात्र सध्या मौन पाळलं जात आहे. पक्षाकडून अद्याप महाविकास आघाडीचं भवितव्य किंवा स्वतंत्र लढण्याबाबतची भूमिका याबाबत अद्याप कोणतंही अधिकृत विधान करण्यात आलेलं नसल्यामुळे शरद पवार नेमका काय विचार करत आहेत, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

अंबादास दानवेंचा काँग्रेस विरोध!

दरम्यान, काही दिवसांपासून विधानपरिषद विरोधी पक्षनेते व शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांच्या अतिआत्मविश्वास महाविकास आघाडीला नडला असल्याची जाहीर भूमिका दानवेंनी घेतली आहे.

“काही काँग्रेस नेते निवडणुकीच्या आधीच आपापल्या मंत्रीपदांबाबत चर्चा करायला लागले होते. खुद्द मुख्यमंत्रीपदासाठी १० स्पर्धक शर्यतीत होते. जर त्यांनी निवडणुकीआधीच उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केलं असतं, तर कदाचित निकाल किमान २ ते ५ टक्के आपल्या बाजूने फिरले असते”, अशी भूमिका दानवेंनी मांडली आहे.

ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांमध्ये अस्वस्थता?

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या काही नवनिर्वाचित आमदारांमध्ये व नेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण असल्याचंही अंबादास दानवे म्हणाले होते. मुंबईत बुधवारी घेण्यात आलेल्या बैठकीत या सर्वांनी मविआमध्ये राहण्याबाबत चिंता व्यक्त केली होती. “आमच्या अनेक आमदारांना असं वाटतं की आम्ही स्वतंत्र मार्ग अवलंबावा, स्वबळावर निवडमुका लढवाव्यात आणि कोणत्याही आघाडीवर विजयासाठी अवलंबून राहू नये. शिवसेनेना कधीच सत्तेच्या मागे धावत गेली नाही. आपण आपल्या विचारसरणीशी प्रामाणिक राहिलो, की सत्ता आपोआप येईल, असं पक्षातील काही आमदार व नेत्यांचं मत आहे”, असा उल्लेख अंबादास दानवेंनी केला होता.

२४ तासांत दानवेंची सारवासारव

दरम्यान, हे विधान केल्याच्या दुसऱ्याच दिवशी अंबादास दानवेंनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं. “मविआमधून बाहेर पडण्याबाबत ते विधान नव्हतं. आमचं मुख्य लक्ष्य हे पक्ष संघटनात्मकदृष्ट्या सक्षम करणं हे आहे. राज्यातल्या सर्व २८८ मतदारसंघांमध्ये पक्षाचा पाया भक्कम करणं हे आमचं ध्येय आहे”, असं ते म्हणाले. मात्र, यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे गट स्वतंत्र लढण्याचा मार्ग स्वीकारू शकतो, असे सूतोवाच केले. “स्थानिक निवडणुकांमधील आघाड्यांबाबतचे निर्णय सहसा स्थानिक नेतृत्वावरच सोपलले जातात. महानगर पालिका निवडणुकांवेळी काय घडतंय ते बघू”, असं अंबादास दानवे म्हणाले.

Video: निकाल लागताच अजित पवारांच्या ‘या’ चालीमुळे एकनाथ शिंदेंची कोंडी; वाचा सविस्तर कारणमीमांसा!

संजय राऊतांनीही दिला दुजोरा

दरम्यान, स्वतंत्र लढण्याबाबत पक्षातून मत व्यक्त होत असल्याच्या चर्चेला संजय राऊतांनीही दुजोरा दिला आहे. “सर्व तीन पक्षांना फटका बसला आहे. सध्या आम्ही परिस्थितीचा आढावा घेत असून हे सर्व काही ईव्हीएम घोटाळा आणि पैशांचा गैरवापर या दिशेनं जात आहे. आम्हाला एकत्र बसून या गोष्टींवर चर्चा करावी लागेल. आम्हाला मविआ म्हणून लोकसभेला यश मिळालं, पण विधानसभेला आम्हाला यश मिळू शकलेलं नाही. त्यामुळे असे निर्णय घाईगडबडीत घेता येत नाहीत”, अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर एकीकडे महायुतीमध्ये सत्तावाटपावरून मतभेद असल्याचं चित्र असताना दुसरीकडे मविआमध्ये स्वतंत्र लढण्याचे सूर उमटत आहेत. त्यामुळे आगामी दोन महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील राजकीय समीकरणं बदललेली पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.