हर्षद कशाळकर

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा डोळा आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील मोर्चेबांधणीला पक्षाने सुरूवात केली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांना पक्षाने संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा करण्यास सुरूवात केली आहे. कर्जत मध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत निर्धार सभा घेऊन बुधवारी पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शनही केले. पण आगामी काळात मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाकांक्षा, शिवसेना शिंदे गटासाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Eknath shinde, shiv sena role, Airoli, belapur assembly election
ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप

रायगड जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षातील कुरघोड्या थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. आधी निधी वाटपावरून धुसफूस, मग आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला विरोध आणि आता एकमेकांच्या मतदारसंघात मोर्चेबांधणी, त्यामुळे सत्ताधारी पक्षात सगळ काही ठीक नसल्याची प्रचिती सातत्याने येत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिवसेना शिंदेगट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील कुरबूरीं वाढल्या आहेत.

हेही वाचा… प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात पक्ष बळकटीसाठी शरद पवार गटाची धडपड

कर्जत खालापूर मतदारसंघातून शिवसेनेचे महेंद्र थोरवे आमदार आहेत. सध्या ते शिंदे गटात आहेत. या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पारंपारीक विरोधी पक्ष राहीले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश लाड यांच्या पराभव करून महेंद्र थोरवे आमदार झाले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षात स्थानिक पातळीवर टोकाचा संघर्ष कायम पहायला मिळाला आहे. आता मतदारसंघातील दोन्ही विरोधक राज्यात सत्तेत एकत्र बसले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे होतांना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत येथील निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने याचीच प्रचिती आली.

हेही वाचा… जमली तर पक्षनिष्ठा नाही तर पक्षापासून सुटका !

कर्जत येथे निर्धार मेळावा घेत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, आदिती तटकरे, अनिकेत तटकरे यावेळी उपस्थित होते. या निर्धार सभेच्या निमित्ताने अजित पवार यांची शहरातून रॅलीही काढण्यात आली. हजारोची गर्दी जमवून पक्षाची ताकद दाखविण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला. यावेळी सुधाकर घारे यांना विधानसभेची उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्याकडून करण्यात आली. तेव्हा आधी लोकसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूकीला आपण एनडीएचा घटकपक्ष म्हणून सामोरे जाणार आहोत. जो उमेदवार दिला जाईल त्याचा पाठीशी ताकदीने उभे रहा, विधानसभा निवडणूकीचे नंतर बघू, तुमची मागणी माझ्या लक्षात आली आहे. असे म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली.

हेही वाचा… ‘बिद्री’ कारखान्याच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ- चंद्रकांत पाटील या मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील कार्यकर्त्यांच्या या मागणीमुळे शिवसेना शिंदे गटाच्या अडचणी वाढणार आहे. विद्यमान आमदार शिवसेनेचा असल्याने ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळावी अशी मागणी राहणार आहे. पण विधानसभेच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सहजासहजी मतदारसंघ शिवसेनेला दिला जाणार नाही याचे संकेत कालच्या निर्धार सभेच्या निमित्ताने दिले आहेत.

माजी आमदार सुरेश लाडांनाही इशारा….

कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून सुरेश लाड राष्ट्रवादी काँग्रेस मधून तीन वेळा निवडून गेले. पण गेल्या काही वर्षापासून तटकरे कुटूंबाशी जमत नसल्याने, पक्षात त्यांचे खच्चीकरण सूरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटूनंतर शरद पवार गटासोबत राहण्याचा निर्णय लाड यांनी घेतला होता. या निर्णयामुळे मतदारसंघात पक्षाची ताकद विभागली जाईल असा कयास वर्तवला जात होता. पण लाड यांच्या प्रभाव क्षेत्रात सुधाकर घारे यांनी निर्धार मेळावा घेऊन आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली. मतदार संघातील लाडांचा प्रभाव संपत चालला असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे ही निर्धार सभा सुरेश लाड यांच्यासाठी इशारा देणारी ठरली.