Haryana Assembly Election: हरियाणा विधानसभेची निवडणूक आता अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपली आहे. ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानात सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये जोरदार लढत होणार असल्याचे दिसते. मागच्या पाच वर्षात राज्यात तीन निवडणुका झाल्या. या निवडणुकांमधील मतदानाची आकडेवारीवरून दिसते की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने एकहाती विजय मिळविल्यानंतर त्यांचे मताधिक्य नंतर झालेल्या निवडणुकीत कमी कमी होत गेले. काही विधानसभा मतदारसंघातून तर अतिशय निसटता विजय झाला असून सरासरी मताधिक्याचा आकडाही कमी झाला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने राज्यातील सर्वच्या सर्व १० जागांवर विजय मिळविला होता. तर देशभरातून त्यांना ३०३ जागा मिळाल्या. २०१४ साली हरियाणातून भाजपाला केवळ सात जागा जिंकता आल्या होत्या. ओ.पी. चौटाला यांच्या नेतृत्वाखालील इंडियन नॅशनल लोक दलाला (INLD) दोन तर काँग्रेसला एका जागेवर विजय मिळविता आला होता. लोकसभा निवडणुकीला विधानसभानिहाय मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भाजपाचा बोलबोला दिसून येईल. विधानसभेच्या ९० जागांपैकी भाजपाने ७९ जागांवर मताधिक्य घेतले होते. याशिवाय भाजपाचे विजयी मताधिक्याची सरासरीही ५० हजार मतांच्या जवळ होती.

maharashtra vidhan sabha election 2024 sanjay kelkar avinash jadhav rajan vichare thane assembly constituency
लक्षवेधी लढत : ‘शिवसेना- ठाणे’ समीकरण अडचणीत?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
shivsena ubt vinod ghosalkar vs bjp manisha Chaudhary
Dahisar Assembly Election 2024: दहिसरमध्ये अटीतटीचा सामना घोसाळकर विरुद्ध चौधरी
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : “…तर रक्तरंजित क्रांती करणार”, एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराची भरसभेत धमकी
murbad constituency kisan kathore subhash pawar, agri and kunbi
मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची
Bhokar Assembly Election 2024 SriJaya Chavan
Bhokar Assembly Election 2024 : श्रीजया चव्हाण विरुद्ध तिरुपती कोंढेकरांमध्ये अटीतटीची लढत; भोकरमध्ये कोणाचं पारडं जड?
Vidhan Sabha Elections, Elections Pune City,
विचार करण्याची हीच ती वेळ…
BJP, sameer meghe, NCP Sharad Pawar ramesh bang
हिंगण्यात मेघेंची हॅटट्रिक बंग रोखणार ?

हे वाचा >> भाजपला धोरणबदलाचा अप्रत्यक्ष सल्ला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका

तर काँग्रेस केवळ १० विधानसभा मतदारसंघात आघाडीवर होती. काँग्रेसच्या विजयी मताधिक्यांची सरासरी ३२ हजार मतांच्या आसपास होती. त्यानंतर दुष्यंत चौटाला यांचा जननायक जनता पक्षानेही (JJP) २०१९ च्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या पक्षाला एका विधानसभेत ५६,००७ मतांचे मताधिक्य होते. तर ११ मतदारसंघात एकूण मतांच्या १० टक्के मतांहून कमी विजयी मताधिक्य पाहायला मिळाले. या ११ विधानसभा मतदारसंघापैकी सात ठिकाणी भाजपा, काँग्रेस तीन आणि जेजेपीचा एका ठिकाणी विजय झाला.

काँग्रेस आणि भाजपा एकमेकांचे प्रतिस्पर्धी

सत्ताधारी भाजपाचा काँग्रेस हा मुख्य प्रतिस्पर्धी आहे. २०१९ साली ९० पैकी ७३ मतदारसंघात भाजपानंतर काँग्रेस द्वितीय क्रमाकांचा पक्ष होता. उरलेल्या ११ मतदारसंघात भाजपा काँग्रेसनंतर दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष होता, ज्याठिकाणी भाजपाचा पराभव झाला. तर जेजेपी पक्ष सहा मतदारसंघात दुसऱ्या स्थानवर होता.

२०१९ विधानसभेचे निकाल

२०१९ साली लोकसभेच्या निवडणूक झाल्यानंतर पाचच महिन्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. ज्यामध्ये लोकसभेपेक्षा भाजपाची कामगिरी खालावलेली दिसली. काँग्रेसने कडवी टक्कर दिल्यामुळे भाजपाला केवळ ४० जागा जिंकता आल्या. ९० आमदारांच्या विधानसभेत बहुमतासाठी असलेला ४६ चा आकडाही भाजपाला गाठता आला नाही. तर काँग्रेसने ३१ जागा जिंकल्या. जेजेपी १० आणि आयएनएलडीला केवळ एक जागा जिंकता आली. स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे जेजेपी पक्ष किंगमेकर ठरला आणि त्यांनी भाजपाशी आघाडी करत सत्ता स्थापन केली.

याउलट २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्वबळावर सत्ता स्थापन केली होती.

२०१९ सालच्या विधानसभेच्या मतदानावर नजर टाकली असता ४७ विधानसभा मतदारसंघात विजयी मताधिक्याची आकडेवारी १० टक्क्यांहून कमी होती. लोकसभेपेक्षा विधानसभेला कडवी टक्कर पाहायला मिळाली. भाजपाने ज्या ४० जागा जिंकल्या तिथेही त्यांना १९ जागांवर काँग्रेसने अतिशय कडवी झुंज दिली.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला देशपातळीवर फटका बसला. तसा हरियाणातही बसला. येथे दहापैकी केवळ पाच मतदारसंघात भाजपाचा विजय झाला. तर पाच मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळविला. विधानसभेआधी भाजपा आणि जेजेपीने आघाडी केली आहे. तर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने आघाडीची चर्चा सुरू केली आहे.

यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४४ विधानसभा मतदारसंघातून सरकारी २५ हजारांचे मताधिक्य मिळालेले आहे. २०१९ च्या तुलनेत यावेळी भाजपाच्या मतांची टक्केवारी घसरल्याचे दिसते. यामुळे ज्याठिकाणी कमकुवत उमेदवार आहेत, त्याठिकाणी त्यांचा पराभव होत असल्याचे दिसत आहे.

दुसऱ्या बाजूला काँग्रेसने ४२ विधानसभा मतदारसंघात सरकारी ३० हजार मतांचे विजयी मताधिक्य घेतले आहे. २०१९ च्या तुलनेत त्यांनी आपल्या मताधिक्यांची सरासरी कायम राखली आहे. तसेच त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. भाजपा ४६ मतदारसंघात दुसऱ्या स्थानावर आहे. तर काँग्रेस ३९ मतदारसंघात मतांच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहेत. तर आम आदमी पक्ष केवळ पाच मतदारसंघात दुसऱ्या स्थानावर आहे.