बुलढाणा: सुसंस्कृत राजकारणाची दीर्घ परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात काका पुतण्या असा राजकीय -निवडणुकीय संघर्ष देखील नवा नाही. बारामतीकर ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध अजितदादा असा संघर्ष लोकसभेत रंगला आणि गाजला. यामुळे नणंद भावजय एकमेकांविरुद्ध लढल्या.त्यापूर्वी बीड जिल्ह्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे, मातब्बर क्षीरसागर घराण्यात देखील हा संघर्ष पाहवयास मिळाला. मात्र काका पुतणी हा राजकीय संघर्ष सुदैवाने अजूनतरी दुर्मिळ म्हणावा! मात्र राजमाता जिजाऊंच्या माहेर असलेल्या सिंदखेड राजा (मतदारसंघ) मध्ये काका विरुद्ध पुतणी असा राजकीय-निवडणुकीय संघर्ष होऊ घातलेल्या विधानसभा लढतीत रंगण्याची चिन्हे आहेत. यासाठी राज्यातील दिग्गज पवार घराणे अप्रत्यक्षपणे का होईना कारणीभूत आहे. गायत्री शिंगणे यांचे वडील हयात असेपर्यंतचा हा कौटुंबिक संघर्ष मागील दोनेक वर्षांत राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. यंदाच्या विधानसभेत काका पुतणी मधील निवडणुकीय संघर्ष लढती पूर्वीच जिल्हाच नव्हे राज्यासाठी लक्षवेधी ठरला आहे.

माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राजेंद्र भास्करराव शिंगणे यांनी काल १९ ऑक्टोबरला घरवापसी करीत शरद पवार यांची तुतारी हाती घेतली. यासाठीचा मुहूर्त मजेदार होता. अजितदादा विधानसभा जागा वाटप साठी देशाच्या राजधानीत गेले असताना राज्याच्या राजधानीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. हर्ष वर्धन पाटील, निंबाळकर यांच्या प्रवेशानंतर हा सोहळा झाला. यावेळी दस्तुखुद्ध शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे संसदीय मंडळ हजर होते. त्यापूर्वी त्यांना थोपविण्याचे जोरकस प्रयत्न अजितदादा गटाकडून करण्यात आले. यामुळे शिंगणेंचे राजकीय महत्व अधोरेखित झाले.

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

हेही वाचा : जागा वाटपावर महाविकास आघाडीचा उद्या फैसला

शिंगणेच का?

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला शिंगणे सोबत का हवे? याचे उत्तर त्यांच्या राजकीय ‘ट्रॅक रेकॉर्ड’ मध्ये दडलंय. तीस वर्षांच्या राजकीय कालावधीत शिंगणे वेळोवेळी मंत्री राहिले. शरद पवारांचे लाडके होण्यापूर्वी त्यांनी १९९५ मध्ये त्यांच्या उमेदवाराला पराभूत करीत आमदारकी मिळविली.यानंतर राष्ट्रवादी मध्ये आल्यावर ते १९९९ ते २००९ पर्यंत घडयाळ वर जिंकत आले.२०१४ मध्ये जिल्हा बँकेला मदत नाकारल्याच्या कारणावरून ते लढले नाही म्हणून शिवसेनेचे शशिकांत खेडेकर आमदार झाले. २०१९ मध्ये ते परतले ,विजयी झाले, पुन्हा आमदार आणि कॅबिनेट मंत्री झाले. शरद पवारांचा आदेश शिरसावंद्य मानून इच्छा नसतानाही दोनदा बुलढाणा लोकसभेची निवडणूक लढविली. बहुचर्चित पहाटेच्या शपथविधीला हजर राहून शरद पवारांकडे परतणारे ते प्रथम आमदार ठरले. यामुळे मोठ्या साहेबांनी चूक भूल माफ करीत त्यांना तातडीने पदरात घेतले. राज्यातील सत्ता संघर्षात एकेक जागा, आमदार किती महत्वाचे याची पवारांना आणि सामाजिक-राजकीय समीकरण मुळे आता(च्या) घडयाळ वर जिंकणे कठीण याची जाणीव शिंगणेंना आहे. यामुळे राजकीय अपरिहार्यतेमुळे हे अघोषित गुरू शिष्य पुन्हा एकत्र आले असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

गायत्री शिंगणेंचा काकाविरुद्ध एल्गार

या पार्श्वभूमीवर गायत्री गणेश शिंगणे या उच्चशिक्षित (एमबीए) तरुणीने आपल्या राजकीय आकांक्षेसाठी शरद पवार गटालाच पसंती दिली. महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष असलेल्या गायत्री आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस असलेले त्यांचे बंधू गौरव शिंगणे यांच्या मदतीने मागील दीड दोन वर्षांपासून सिंदखेडराजा मतदारसंघ पालथा घातला आहे.विविध सामाजिक उपक्रम राबविले. अलीकडे त्यांनी काढलेला मोर्चा गर्दी खेचनारा ठरला. काकांच्या कार्यकाळात मतदारसंघाचा विकास खुंटल्याच्या मुद्यावरून त्यांनी सिंदखेड मध्ये रान उठविले आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या भेटी घेऊन उमेदवारीची मागणी केली. मुलाखत दिली आहे. मात्र आता काकानी तुतारी हाती घेतल्याने अडचण झाली आहे.मात्र त्यांनी काकांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी पवारांकडे केली आहे. उमेदवारी दिल्यास आपण अपक्ष लढणारच असे जाहीर केले असून ‘तुतारी’ तुनच रणशिंग फुंकले आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना आमदारकीचे वेध

घड्याळ वर लढण्याची शक्यता?

दरम्यान शिंगणेच्या पक्षत्याग मुळे धक्का बसलेल्या अजित पवारांनी सिंदखेड मधून लढण्याचा निर्धार केला आहे. मात्र शिंदे गटाने देखील मागणी केली असून त्यांच्याकडे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या रूपाने सक्षम उमेदवार आहे. भाजपनेही उचल खाल्ली असून तिघांनी मागणी केली आहे. मात्र खेडेकर धनुष्य सोडून हाती घडयाळ बांधण्याची शक्यता कमी आहे. यामुळे अजितदादाकडे गायत्री शिंगणे हा पर्याय आहे.स्वेच्छा निवृत्त उपजिल्हाधिकारी दिनेश गीते हे सामाजिक समीकरण मध्येही बसतात. समृद्धी मार्गाच्या भूसंपादन मध्ये महत्त्वाची भूमिका असणारे गीते यांचा मतदार संघात चांगला संपर्क आहे.मात्र मतदारसंघात शिंगणे या नावाचे वलय, गारुड लक्षात घेता अजितदादांची पहिली पसंती गायत्री राहणार आहे. त्यासाठी राजेंद्र शिंगणे विरोधक एकवटत असल्याचे चित्र आहे.

Story img Loader