बुलढाणा: सुसंस्कृत राजकारणाची दीर्घ परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात काका पुतण्या असा राजकीय -निवडणुकीय संघर्ष देखील नवा नाही. बारामतीकर ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध अजितदादा असा संघर्ष लोकसभेत रंगला आणि गाजला. यामुळे नणंद भावजय एकमेकांविरुद्ध लढल्या.त्यापूर्वी बीड जिल्ह्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे, मातब्बर क्षीरसागर घराण्यात देखील हा संघर्ष पाहवयास मिळाला. मात्र काका पुतणी हा राजकीय संघर्ष सुदैवाने अजूनतरी दुर्मिळ म्हणावा! मात्र राजमाता जिजाऊंच्या माहेर असलेल्या सिंदखेड राजा (मतदारसंघ) मध्ये काका विरुद्ध पुतणी असा राजकीय-निवडणुकीय संघर्ष होऊ घातलेल्या विधानसभा लढतीत रंगण्याची चिन्हे आहेत. यासाठी राज्यातील दिग्गज पवार घराणे अप्रत्यक्षपणे का होईना कारणीभूत आहे. गायत्री शिंगणे यांचे वडील हयात असेपर्यंतचा हा कौटुंबिक संघर्ष मागील दोनेक वर्षांत राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. यंदाच्या विधानसभेत काका पुतणी मधील निवडणुकीय संघर्ष लढती पूर्वीच जिल्हाच नव्हे राज्यासाठी लक्षवेधी ठरला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा