युपी मे का बा फेम सिंगर नेहा राठोडने आता आपलं नवं गाणं आणलं आहे. या गाण्यामध्ये नेहाने बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला आहे. बेरोजगार बानी साहेब रोजगार मांगिला असे या गाण्याचे बोल आहेत. सरकारला वाटत असेल तर त्यांनी मला या गाण्यासाठीही नोटीस पाठवावी असंही नेहा राठोडने म्हटलं आहे. तिच्या या गाण्याचीही चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे.

मंगळवारीच उत्तर प्रदेश पोलिसांनी नेहा राठोडला एक नोटीस धाडली आहे. कानपूर अग्निकांड प्रकरणाचा मुद्दा पुढे आणून जे गाणं तयार केलं होतं त्यावरून ही नोटीस पाठवण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार का बा सिझन २ या व्हिडिओतून नेहा राठोड यांनी तणाव आणि वैमनस्य वाढवलं. या नोटिशीला तीन दिवसात उत्तर द्यावं असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

Hritik Roshan And Rajnikant
“मला जे वाटेल, ते मी…”, जेव्हा हृतिक रोशनच्या चुकीची रजनीकांत यांनी घेतलेली जबाबदारी; अभिनेत्याने आठवण सांगत म्हटलेले, “त्यांनी माफ…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
a young guy holding paati in hand wrote amazing message who burst so many firecrackers in Diwali
Video : “दिवाळीत फटाके तेवढेच फोडा…”; तरुणाने सुनावले खडे बोल, पाटी होतेय व्हायरल
Meenakshi Seshadri
“चित्रपटाच्या करारावर सही…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ गोष्टीमुळे कोसळले होते रडू; मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!
Should buy gold or diamond jewellery on Diwali
Money Mantra : दिवाळीत सोन्याचे की हिऱ्याचे दागिने घ्यावेत?
suraj chavan new reel comments
सूरज चव्हाणचे ट्रेडिंग गाण्यावर रील पाहून युजर म्हणाला, “भाऊ, तू असे व्हिडीओ नको बनवत जाऊस…”

या नोटीसला उत्तर देण्याआधीच नेहा राठोडने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवं गाणं शेअर केलं आहे. यामध्ये बेरोजगार बानी साहेब रोजगार मांगिला, भीख नाही हक सरकार मांगिला, दो करोड नौकरी देवे का रहे वादा, कहत रहे रोजगार मिली जादा असं गाणं पोस्ट केलं आहे.

हेही वाचा : विश्लेषण : नेहा सिंह राठोड यांच्या विरोधात भाजप समर्थकांचा तळतळाट का?

माझ्या गाण्यामुळे सामाजिक शांतता भंग होऊ शकते

व्हिडिओ शेअर करत नेहा राठोडने हे म्हटलं आहे की रोजगार मागण्यासाठी युवकांसाठी हे गाणं मी शेअर केलं आहे. या गाण्यामुळे सामाजिक शांतता भंग होऊ शकते. युवक त्रास देऊ शकतात. या गाण्यासाठी जरी मला नोटीस पाठवायची असेल तर पाठवू शकता असंही नेहाने म्हटलं आहे.

काही तासांमध्येच या व्हिडिओला ट्विटरवर ५० हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. अनेक युजर्सनी या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शेफाली तोमर नावाची एक युजर म्हणते की प्रत्येक नागरिकाला हा हक्क आहे की ते सरकारवर टीका करू शकते. तसंच विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

कोण आहे नेहा सिंह?

बिहारच्या कैमूर जिल्ह्यात राहणाऱ्या नेहा सिंह राठोडचा जन्म १९९७ मध्ये झाला होता. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या दरम्यान नेहाचं यु. पी. मे का बा? हे गाणं चांगलंच प्रसिद्ध झालं होतं. यानंतर नेहाने याच गाण्याचे दोन पार्ट तयार केले होते. बिहारमध्ये जन्मलेल्या नेहाने तिचं शिक्षण बिहारमध्येच घेतलं आहे. तसंच कानपूर विद्यापीठातून तिने पदवी घेतली आहे. २०१८ मध्ये तिने गायिका म्हणून आपल्या लोकगीत गाण्याच्या कलेला सुरूवात केली. सामाजिक विषयांवर गाणारी गायिका म्हणून नेहा सिंह अल्पावधीत लोकप्रिय झाली. ब्लाऊज हुक आणि लेहंगा स्ट्रिंग या प्रकारातून भोजपुरी गाणी बाहेर काढणं तिला आवश्यक वाटतं. तसंच चांगल्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी ती घरापासून दूर वाराणसीत एका हॉस्टेलमध्येही राहिली होती. बिहारच्या खेड्यात मुलींचं काही चालत नाही. त्यांना बोलण्याची इच्छा असते पण बोलू दिलं जात नाही ऐकून घेतलं जात नाही. मला हा दृष्टीकोन बदलायचा होता म्हणून मी गाणं शिकले असंही नेहाने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.