औरंगाबाद : जी – २० समूह देशातील महिलांची परिषद औरंगाबादमध्ये होत असताना आणि महिला मतदानाचा टक्का वाढत असताना योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्याबरोबर स्वप्रतिमा काढण्याचा विशेष कार्यक्रम भाजपाच्या वतीने सोमवारी औरंगाबाद शहरातील तापडिया रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. पुरुषांपेक्षाही महिलांची मते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामागे अधिक असल्याचा दावा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर यांनी केला आहे. केवळ लाभ देऊन संबंध तोडायचा नसतो, तर लाभार्थीबरोबरचा संवाद कायम ठेवायचा असतो, असे भाजपाची धारणा आहे. त्यामुळेच महिलांबरोबर मंत्री आणि मंत्री स्मृती इराणी यांच्याबरोबर महिला, असे छायाचित्र घेण्याची मूभा असणारा कार्यक्रम आखला असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विविध योजनांच्या लाभार्थीना मतदार करण्याची प्रक्रिया गेल्या काही वर्षांत भारतीय जनता पक्षाने पद्धतशीरपणे विकसित केली आहे. ग्रामीण भागात सार्वजिक वितरण प्रणालीतील धान्य असो किंवा जनधन खाते काढणे असो, तीन तलाकचा कायदा मंजूर केल्यानंतरही उत्तर प्रदेशातील मुस्लीम महिलांनी नरेंद्र मोदी यांना मतदान केल्याचा दावा भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे. देशभरात महिला मतदानाच्या टक्केवारीत गेल्या काही निवडणुकीत मोठी वाढ झाल्याची आकडेवारी आहे. उज्जवला गॅससह दिनदयाल कौशल्य विकास योजनेतून शहरी भागांतील महिलांना शिलाईचे प्रशिक्षण देऊन अनेक लाभार्थी तयार करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. तो ‘लाभार्थी’ व्यक्ती आणि त्यातही महिला भाजपाच्या मतदार व्हाव्यात, असे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत.

हेही वाचा – सहकारमंत्री म्हणतात टॅबचे वितरण होईल…

हेही वाचा – सोनिया गांधींचे निवृत्तीचे संकेत

स्मृती इराणी यांच्या समवेत स्वप्रतिमा अंकित करण्याचा कार्यक्रमही त्याच साखळीतील कार्यक्रम असल्याचे सांगण्यात येत आहे. जी-समूह देशातील महिलांची स्थती, त्यावरील उपाययोजनांवरील चर्चा औरंगाबादमध्ये होत असताना हा कार्यक्रम होत आहे. गेल्या काही निवडणुकीतील महिला मतदारांचा कल भाजपाला अनुकूल असल्याचे दिसून येत आहे, त्याचे कारण राबविण्यात आलेल्या विविध योजना असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातूनही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.