हर्षद कशाळकर

अलिबाग: महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभांमधून घटक पक्षांची मोट बांधण्याचे काम सुरु असतानाच, ठाकरे शिवसेनेच्या ठाकरे गटाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेण्याचा सपाटा सुरु केला आहे. त्यामुळे घटक पक्षांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
Raj Thackeray on chhava movie Video
Raj Thackeray: “छत्रपती संभाजी महाराजांनी कधीतरी लेझीम…”, ‘छावा’चित्रपटावर राज ठाकरेंची रोखठोक भूमिका
Balasaheb Thackeray grandson Aaishvary to debut in Bollywood
बाळासाहेब ठाकरेंचा नातू बॉलीवूडमध्ये करणार पदार्पण, अनुराग कश्यपबरोबर मिळाला पहिलाच प्रोजेक्ट
Thackeray groups protest against ST ticket price hike in thane
ठाकरे गटाचे एसटी तिकीट दरवाढी विरोधात आंदोलन
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार

गेल्या महिन्यात खेड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. आता काँग्रेसच्या महाडच्या काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप आणि मतदार संघातील बहुतांश प्रतिनिधी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. या दोन्ही पक्षप्रवेशामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अस्वस्थता पसरली आहे. ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीतील घटक पक्षांची फोडाफोडी सुरु झाली आहे की काय असे प्रश्न यामुळे उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

आणखी वाचा-कर्नाटकनंतर मध्य प्रदेशमध्येही भाजपाला मोठा धक्का; माजी मंत्री दीपक जोशी काँग्रेसमध्ये दाखल

आगामी विधानसभा निवडणूकांची तयारी म्हणून संभाव्य उमेदवारांची चाचपणी ठाकरे गटाने सूरू केली आहे. स्नेहल जगताप या त्यांच्या उमेदवार असण्याची शक्यता आहे. भरत गोगावले शिंदे गटात दाखल झाल्यानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी या पक्षप्रवेशामुळे भरून निघणार आहे. गोगावले यांचा मतदारसंघातील जनसंपर्क लक्षात घेता, त्यांच्या समोर तितक्याच ताकदीचा उमेदवार देणे गरजेचे आहे. अशा वेळी स्नेहल जगताप यांच्या निमित्ताने मतदार संघातील प्रस्थापित चेहरा ठाकरे गटाला मिळाला आहे. महाड शहराच्या माजी नगराध्यक्ष म्हणून त्या जनमानसात लोकप्रिय आहेत. काँग्रेसच्या पक्ष संघटनेत त्यांनी माजी आमदार माणिक जगताप यांच्या पश्चात स्वताचे दरारा निर्माण केला होता. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारीणीवर त्यांनी काम केले आहे. असा प्रतिभावान चेहरा ठाकरे गटाच्या गळाला लागल्याने, त्यांना मतदार संघातील पक्षसंघटनेला पुन्हा उभारी देण्यास मदत होणार आहे.

महत्वाची बाब म्हणजे स्नेहल जगताप यांच्यासह, माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत जगताप आणि काँग्रेसच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे मतदारसंघात काँग्रेसची मात्र कोंडी झाली आहे. काँग्रेसची जिल्ह्यातील उरली सुरली ताकदही संपुष्टात येणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजीचा सूर आहे.

आणखी वाचा-शरद पवार सोमवारी निपाणीत कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता

महाड येथील सभेत उध्दव ठाकरे यांनी बोलतांना यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. स्नेहल जगताप यांच्या सह काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला असला, तरी याचा अर्थ मी काँग्रेस फोडतो असा होत नसल्याचे स्पष्ट केले. विदर्भात शिवसेना ठाकरे गटाची काँग्रेसला मदत झाली असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले होते. पण या स्पष्टीकरणावरून काँग्रेसचे समाधान झाल्याचे दिसून येत नाही, कारण या पक्षप्रवेशानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी स्नेहल जगताप यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर नाराजी व्यक्त केली. मित्र पक्षांना कमजोर करणे चुकीचे आहे. महाविकास आघाडीची जेव्हा बैठक होईल तेव्हा याबद्दल आम्ही विचारणा करू, तसेच महाडची जागा ही काँग्रेसची असून आम्ही ती लढणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

एकुणच राज्यातील विविध भागात व्रजमुठ सभा घेऊन महाविकास आघाडीतील घटकपक्षात समन्वय वाढवण्याचे प्रय़त्न सुरु असतांना, दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे नेते फोडण्याकडे ठाकरे गटाचा कल दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांत अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे.

Story img Loader