सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील बहुचर्चीत संचालकांच्या संस्थांना कर्जवाटप घोटाळा प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यानंतर आता याप्रकरणाचा निकाल काय लागणार, याविषयी सार्वत्रिक उत्सुकता पसरली आहे.
सहकार खात्याचे निवृत्त अप्पर निबंधक तथा चौकशी अधिकारी किशोर तोष्णीवाल यांच्यासमोर ही चौकशी झाली आहे. एकेकाळी संपूर्ण राज्यात लौकिक प्राप्त ठरलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या ११०४ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या आजी-माजी ३६ संचालकांसह २१ अधिकारी व कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. यात प्रामुख्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, प्रा. लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार राजन पाटील आदींचा समावेश आहे. याप्रकरणी सहकार खात्याचे निवृत्त अप्पर निबंधक अधिकारी किशोर तोष्णीवाल यांच्यासमोर चौकशी सुरू आहे.
हेही वाचा : RSS UP: लोकसभेत पेपरफुटीचा भाजपाला फटका; उत्तर प्रदेशमध्ये आता RSS सक्रिय, भरतीप्रक्रियेतील उमेदवारांना मदत
याप्रकरणी सुनावणी होऊन दोन्ही बाजूकडून युक्तिवाद पूर्ण करण्यात आला. त्याच्या आजी-माजी संचालकांशी संबंधित संस्थांना मनमानी पद्धतीने कर्ज देणे, आर्थिक अनियमितता होणे, नियमबाह्य कर्ज वाटप करणे आदी प्रकरणात आजी-माजी संचालकांना जबाबदार धरण्यात आले आहे. त्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी ही चौकशी प्रक्रिया सुरू आहे.
या चौकशीत संबंधित आजी-माजी संचालक, व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी सहकार कायदा कलम ८३ नुसार होणाऱ्या चौकशीला आक्षेप घेतला असून त्यावर येत्या ६ सप्टेंबर रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने चौकशी अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण दिले जाणार आहे. त्यानंतर चौकशी अधिकारी निकाल देणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण ऐरणीवर आल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.