मणिपूरमध्ये ३ मे रोजी मैतेई आणि कुकी समाजातील वादातून दंगली सुरू झाल्या. या दंगलीला आता साधारण ५० दिवस झाले आहेत. मात्र अद्याप येथील हिंसाचार थांबलेला नाही. या हिंसाचारात आतापर्यंत कित्येक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. असे असतानाच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मणिपूरच्या जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. त्यांनी भाजपा पक्ष तसेच अन्य कोणत्याही नेत्याला दोष न देता सोनिया गांधी यांनी हे आवाहन केले आहे.

मणिपूरमधील विरोधक मोदींच्या भेटीला पोहोचले होते

मागील ५० दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. येथे अनेक लोकांना स्वत:चे घर सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले आहे. या आठवड्यात मणिपूरमधील विरोधी पक्षाचे नेते पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये आले होते. मात्र या नेत्यांना मोदी यांनी भेट दिली नसल्याचे म्हटले जात आहे. कित्येक लोकांचा या दंगलीमध्ये मृत्यू झाला आहे. याच कारणामुळे काँग्रेससह विरोधी पक्षातील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपावर गंभीर आरोप करत आहेत. मणिपूरमधील हिंसाचार थांबवण्यासाठी मोदी यांच्याकडून कोणताही प्रयत्न केला जात नाही, असे विरोधक म्हणत आहेत. दरम्यान सोनिया गांधी यांनी कोणालाही दोष न देता तसेच कोणावरही आरोप न करता मणिपूरमधील जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका

भारतावर खूप मोठा आघात- सोनिया गांधी

“मागील ५० दिवसांपासून मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. या हिंसाचारामुळे मणिपूरमधील अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. तेसच अनेकांना आयुष्यभराची कमाई मागे सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले आहे. मणिपूरमधील सध्याची परिस्थिती ही भारतावर खूप मोठा आघात आहे. लोकांना त्यांचे घर सोडून जावे लागले. अनेकांचा मृत्यू झाला. यामुळे मला खूप दु:ख झाले आहे,” अशा भावना सोनिया गांधी यांनी व्यक्त केल्या.

विभाजनवादी विचार पेरण्यासाठी एक चुकीचे पाऊलही पुरेसे

“मणिपूरमधील नागरिक आतापर्यंत एकमेकांसोबत बंधू-भगिणींप्रमाणे राहिले आहेत. मात्र हेच लोक आता एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. सर्व जाती, धर्म आणि पंथाच्या लोकांना सामावून घेण्याचा मणिपूरचा इतिहास आहे. बंधूभाव जोपासण्यासाठी विश्वास आणि सद्भावना पाहिजे. तर दुसरीकडे द्वेष आणि विभाजनवादी विचार पेरण्यासाठी एक चुकीचे पाऊलही पुरेसे आहे,” असे म्हणत सोनिया गांधी यांनी मणिपूरमधील जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.

शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्या..

“सध्या आपण एका वेगळ्या वळणावर उभे आहोत. आपण चांगल्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला तर आपल्यामुळे आगामी पिढीचे भविष्य ठरेल. मी मणिपूरच्या लोकांना तसेच तेथील माझ्या भगिनींना आवाहन करते की त्यांनी शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. एक आई म्हणून मी मणिपूरमधील महिलांचे दु:ख समजू शकते,” असेही सोनिया गांधी म्हणाल्या.

ओकराम इबोबी सिंह यांनी घेतली होती सोनिया गांधी यांची भेट

मणिपूर हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसचे वरिष्ठ नेते ओकराम इबोबी सिंह हे मणिपूरचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी २००२ ते २०१७ या काळात मणिपूरमध्ये मुख्यमंत्री राज्यकारभार हाकलेला आहे. त्यांनी बुधवारी (२१ जून) अचानकपणे सोनिया गांधी यांची भेट घेतली तसेच मणिपूरमधील जनतेला शांतता बाळगण्याचे आवाहन करावे, अशी विनंती केली. त्यानंतर सोनिया गांधी मणिपूरमधील जनतेला शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन केले आहे.