भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय ) अध्यक्षपदी सौरव गांगुलीच्या जागी १९८३ च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची वर्णी लागल्याची शक्यता आहे. रॉजर बिन्नींची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. मंगळवारी ( १८ ऑक्टोंबर ) ‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. त्याच दिवशी बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षाची घोषणा होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, सौरव गांगुलीची गच्छन्ती केल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच, गांगुलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी ) अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याची परवानगी मिळावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती करणार असल्याचं मुख्यमंत्री बॅनर्जींनी म्हटलं आहे. त्या कोलकाता विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधता होत्या.

हेही वाचा – पराभवाच्या भीतीने मुरजी पटेल माघार घेणार?

“बीसीसीआय अध्यक्ष असताना सौरव गांगुलीने उत्तम प्रशासक असल्याचं सिद्ध केलं आहे. पण, त्याला अध्यक्षपदावरून हटवल्याने मला धक्का बसला असून, हा सौरववर अन्याय आहे. मात्र, आता आयीसीसी अध्यक्षपदासाठी सौरवला निवडणूक लढण्याची परवानगी द्यावी, अशी पंतप्रधान मोदींकडे विनंती करणार आहे. याप्रकरणात कोणतेही राजकारण होऊ नये,” अशी अपेक्षाही मुख्यमंत्री बॅनर्जींनी व्यक्त केली.

हेही वाचा – बबनराव लोणीकरांचे मंत्रीपद हुकल्याने आता मुलावर नवी जबाबदारी!

दरम्यान, सौरव गांगुलीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात येणार आहे. त्याच्या जागी रॉजर बिन्नींची निवड होईल. तर, जय शाह आपल्या सचिव पदावर कायम राहणार आहेत. यावरून तृणमूल काँग्रेसने यापूर्वीच भाजपावर निशाणा साधला होता. विधानसभा निवडणुकीत गांगुलीने भाजपाला नाही म्हणण्याची किंमत भोगावी लागत आहे, असा आरोप तृणमूलने केला होता.

हेही वाचा – आमदार अनिल बाबर यांनी काढले गोपीचंद पडळकर यांचे ‘संस्कार’!

यावर प्रतिक्रिया देताना तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले की, “भाजपात प्रवेश करण्याबाबत सौरव गांगुलीशी चर्चा करण्यात आली होती. पण, गांगुलीने त्यास नकार दिला. २०२१ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतर भाजपाने गांगुलीच्या नावाचा वापर केला. मग, गांगुलीला दुसऱ्यांदा बीसीसीआयचा अध्यक्ष का? बनवलं जात नाही. भाजपा सौरव गांगुलीचा अपमान करत आहे,” असा आरोपही घोष यांनी केला होता.