South Goa SP Sunita Sawant : दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी कार्यभार सोडाण्याबाबतचा, आदेश गोवा सरकारने काढल्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आले. अचानक मध्यरात्री काढलेल्या या आदेशावरून काँग्रेसने भाजपा सरकारला लक्ष्य केले असून, जिल्ह्यातील बजरंग दलाच्या नेत्यांबद्दल माहिती मागवल्यामुळे त्यांची बदली केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दरम्यान गोवा सरकारने अंमली पदार्थ विरोधी शाखेचे पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्याकडे दक्षिण गोव्याचा अतिरिक्त कारर्यभार सोपवला आहे. सावंत यांना सोमवारी रात्री वायरलेस संदेशाद्वारे पद कार्यभार सोडण्यास सांगण्यात आले गेले. त्या फ्रेब्रुवारी २०२४ पासून या पदावर होत्या. अधिकाऱ्यांच्या दिलेल्या माहितीनुसार, सावंत यांच्या बदलीचा अधिकृत आदेश अद्याप जारी झालेला नाही.

या प्रकरणावर बोलताना सुनीता सावंत म्हणाल्या की, “मला याबद्दल काहीही माहिती नाही. मी माझे कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडले आहे. मला पदभार सोडण्यास आणि मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते, त्यामुळे मी आदेशाचे पालन केले.”

काँग्रेसचे आरोप

“गोव्यात बजरंग दलाच्या नेत्यांबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात करताच, सरकारने घाबरून त्यांची तात्काळ बदली केली,” असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, “यावरून स्पष्ट होते की भाजपला प्रशासनात रस नाही तर त्यांच्या वैचारिक साथीदारांना संरक्षण देण्यात आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना दडपण्यात रस आहे.”

पाटकर यांनी असाही आरोप केला की, “ही घाईघाईने केलेली बदली, भाजप-आरएसएस विचारसरणी त्यांच्या फुटीरतावादी अजेंड्याचे रक्षण करण्यासाठी प्रशासनात कशी हस्तक्षेप करत आहे याचे आणखी एक उदाहरण आहे”.

बजरंग दलाचे गोवा संयोजक विराज देसाई म्हणाले की, “पोलीस अधीक्षकांच्या बदलीबद्दल किंवा पोलीस त्यांच्या संघटनेच्या सदस्यांबद्दल काही माहिती मागत आहेत की नाही याबद्दल मला कोणतीही माहिती नाही. यामध्ये बजरंग दलाचे नाव अनावश्यकपणे ओढले जात आहे. आम्हाला पोलिसांच्या कारभारात रस नाही.”

दरम्यान सावंत यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यापूर्वी, त्यांना राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते विशेष मान्यता पुरस्कार मिळाला होता. याचबरोबर गेल्या वर्षी त्यांची विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदकासाठीही निवड झाली होती.

पोलीस सेवेत येण्यापूर्वी सावतं होत्या शिक्षिका

सुनीता सावंत यांनी १९८९ मध्ये धेम्पे महाविद्यालयातून रसायनशास्त्रात पदवी घेतली आहे. त्यानंतर काही दिवस त्यांनी शिक्षिका म्हणून काम केले होते. त्या १९९० मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या. दरम्यान तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्यावरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकामध्ये त्यांचाही समावेश होा. २०१४ मध्ये त्यांना पोलीस उपअधीक्षकपदी बढती मिळाली होती.

राजकीय हितासाठी पोलिसांचा वापर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आरोप केला की, “कायदा राखण्याऐवजी भाजपाच्या राजकीय हितासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे. सरकार काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे? बजरंग दलाच्या नेत्यांच्या निष्पक्ष चौकशीला ते का घाबरत आहेत?”

बंजरंग दलावरील आरोप

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी झालेल्या रामजन्मभूमी आंदोलनात बजरंग दलाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. बाबरी मस्जिद विध्वंसानंतर या संघटनेवर बंदी घालण्यात आली होती परंतु एका वर्षानंतर ही हटवण्यात आली होती. दरम्यान बजरंग दल बेकायदेशीर धर्मांतर आणि लव्ह जिहाद या मुद्द्यांवरून अल्पसंख्याकांना त्रास देत असल्याचा आरोप अनेक वर्षांपासून होत आहे.

Story img Loader