अण्णाद्रमुक पक्षाने भाजपाप्रणित एनडीए युतीमधून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने पुन्हा युती करण्याबाबत विचारविमर्ष सुरू केला आहे. लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे भाजपाकडून युती करण्याबाबतचा आढावा घेतला जात आहे. सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन चेन्नई येथे मंगळवारी (दि. २६ सप्टेंबर) एका सरकारी कार्यक्रमासाठी उपस्थित असताना भाजपाने त्यांना अण्णाद्रमुक पक्षाशी असलेल्या युतीबाबतचा आढावा घेण्यास सांगितले.

अण्णाद्रमुक पक्ष गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्यावर नाराज होता, मात्र या नाराजीमुळे ते थेट युती तोडतील, अशी भाजपाला अपेक्षा नव्हती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बाजूला भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व २०२४ च्या निवडणुकांसाठी एनडीएमधील घटक पक्षांना पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे अण्णामलाई वादग्रस्त वक्तव्य करत असतानाही त्यांना मोकळीक देण्यात आली, याचा अर्थ भाजपा नेतृत्वालाच अण्णद्रमुक पक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असल्याचे दिसते. भाजपाला २०२४ साली पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर दक्षिणेतील राज्यातून चांगली कामगिरी करण्याचे लक्ष्य पक्षश्रेष्ठींनी ठेवले आहे, इथेच निर्मला सीतारमन यांचा या प्रकरणात प्रवेश केला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Supriya Sule Badlapur, Subhash Pawar Prachar,
सुभाष पवार जायंट किलर ठरणार, सुप्रिया सुळे यांचा दावा, बदलापुरात सभेत भाजपावर टीका
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
maharashtra assembly election 2024 maha vikas aghadi vs mahayuti battle in konkan region
विश्लेषण : कोकणात लोकसभेतील यशाची पुनरावृत्ती महायुती दाखवणार का? महाविकास आघाडीला संधी किती?
maharashtra vidhan sabha election 2024 akola west constituency equation will change due to vanchit aghadi role impact on vote count the constituencies twist increased
वंचितच्या भूमिकेमुळे ‘अकोला पश्चिम’चे समीकरण बदलणार

हे वाचा >> भाजप-अण्णा द्रमुक युती संपुष्टात; अण्णा द्रमुक नेत्याची घोषणा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि अण्णाद्रमुक पक्षाने पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढविली होती. त्यांचे विरोधक द्रमुकप्रणित आघाडीने ३८ जागा लढवून त्यापैकी ३७ लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. (तामिळनाडूत ३९ लोकसभा मतदारसंघ असून एक जागा नंतर जिंकली). भाजपाने चार मतदारसंघात निवडणूक लढविली, मात्र त्यांना एकमात्र विद्यमान खासदाराचा मतदारसंघ राखण्यात अपयश आले.

भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने हल्लीच सांगितले की, अण्णाद्रमुक पक्षाशी युती अबाधित ठेवण्याकरिता आपापसातील मतभेद दूर करण्यासाठी भाजपा नेतृत्वाला आणखी थोडा वेळ हवा आहे. तामिळनाडूमधील निवडणुकीवर भाजपा नेतृत्वाने गंभीरपणे विचार करण्यास सुरुवात केली आहे. या नेत्याने आठवण करून दिली की, अण्णामलाई यांना काही दिवसांपूर्वीच अण्णाद्रमुक पक्षाविरोधात प्रक्षोभक, चिथावणीखोर वक्तव्य करू नये, अशी समज देण्यात आली होती. यातून असे दिसते की, राष्ट्रीय नेतृत्वाला अण्णाद्रमुक पक्षाशी असलेली युती कायम ठेवण्यात रस आहे. मात्र, तरीही भाजपा प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी अण्णाद्रमुक पक्षाचे प्रेरणास्त्रोत सी. एन. अण्णादुराई आणि जयललिता यांना आपल्या वक्तव्यातून लक्ष्य करणे सुरूच ठेवले.

अण्णामलाई यांनी सनातन धर्माच्या प्रकरणावर जोरदार टीकास्र सोडले. तसेच सी. एन. अण्णादुराई यांच्यावर केलेल्या विधानानंतर त्यांनी सारवासारव करत अण्णादुराई यांचा वारसा त्यांना मान्य असल्याचे म्हटले. हा वारसा मान्य असला तरी अण्णाद्रमुकचे विद्यमान नेते ई. के. पलानीस्वामी यांना एनडीए युतीचे नेते म्हणून ते स्वीकारणार नाही, अशी थेट भूमिका अण्णामलाई यांनी मांडली. द इंडियन एक्सप्रेसने २२ सप्टेंबर रोजी दिलेल्या बातमीनुसार, अण्णाद्रमुक पक्षाचे एक शिष्टमंडळ भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी दिल्ली येथे पोहोचले होते. या बैठकीची माहिती असलेल्या एका नेत्याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, अण्णाद्रमुक पक्षाच्या विरोधात वारंवार प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या अण्णामलाई यांच्याविरोधात शिष्टमंडळाने भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. शिष्टमंडळाने सांगितले की, “अण्णामलाई यांच्यावर कारवाई करावी किंवा तामिळनाडूतील युती अबाधित राहावी यासाठी भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने राज्यात एनडीए संयोजकांची नियुक्ती करावी. तसेच आगामी निवडणुकीतून अण्णामलाई यांना दूर करण्यात यावे.”

आणखी वाचा >> अण्णा द्रमुकचे दबावतंत्र की भाजपशी खरेच काडीमोड?

भाजपा नेतृत्वाने अद्याप या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली नाही. अण्णाद्रमुक पक्षाने सोमवारी चेन्नई येथे पक्षाची बैठक घेतली. या बैठकीनंतर अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी युतीवर टीका केली.