गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीतील राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दोन टप्प्यांतील मतदान संपुष्टात आले असून, ०७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सध्या आग्रा लोकसभा मतदारसंघाचीही चर्चा काहीशी गायब झालीय. या मतदारसंघात २०.५७ लाख मतदारांपैकी सुमारे ३० टक्के दलित मतदार आहेत. त्यापैकी जवळपास तीन चतुर्थांश जाटव दलित आहेत. जे भाजपावर नाराज असून, सध्या बसपाबरोबर आहेत. खरं तर आग्रा लोकसभेची जागा भाजपाने मागील तीन वेळा जिंकली आहे, यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री एसपी सिंग बघेल यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली. समाजवादी पक्ष-काँग्रेस आणि बसपा या दोन्ही पक्षांनी अनुक्रमे सुरेश चंद कर्दम आणि पूजा अमरोही या जाटव दलित उमेदवारांना मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते ओम प्रकाश यांनी वैश्य, ब्राह्मण, पंजाबी, बिगर यादव ओबीसी आणि दलितांच्या पाठिंब्याने भाजपाला आग्रामध्ये विजय मिळवून दिला आहे. “आम्ही १९८९ पासून महापौरपदाच्या निवडणुका जिंकत आहोत आणि २०२२ मध्ये लोकसभेच्या अंतर्गत पाचही विधानसभा मतदारसंघ जिंकले होते. आग्रा आमचा बालेकिल्ला आहे,” असेही ओम प्रकाश म्हणतात. आग्रा कॅन्टोन्मेंट विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या बसई खुर्दमध्ये बसपा प्रमुख मायावती शक्ती पणाला लावतील आणि पक्षाला आग्रामध्ये विजय मिळवून देतील, अशी तिथल्या मतदाराने आशा व्यक्त केली आहे. बसपाने बाबासाहेब आंबेडकर जयंती केक कापून आणि मुलांमध्ये तो वाटून साजरी केली. उच्च जाती आणि मुस्लिमांनी मायावतींना पाठिंबा दिल्यास मायावती एक दिवस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असंही मायावतींचे पुतणे आकाश आनंद म्हणाले होते. प्रदेश भाजपा, काँग्रेस आणि सपा सोशल मीडियापुरते मर्यादित असताना केवळ मायावतींनाच जनतेची काळजी आहे, असंही आकाश सांगतात. बसपाचे पेशाने सूतार असलेले मतदार श्रीपाद सांगतात की, तेसुद्धा बसपा जिंकण्याची आशा व्यक्त करतात. मायावतींचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ चांगला होता. भाजपाने कायदा आणि सुव्यवस्था सुधारली असेल, पण दलित म्हणून मला बहेनजींच्या राजवटीत सर्वात सुरक्षित वाटले,” असेही ते सांगतात.
हेही वाचाः जालन्यात निवडणुकीपेक्षा मतदारांना पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा
३५ वर्षीय ललित वाल्मिकी यांनीसुद्धा मायावतींचं कौतुक केलं आहे. मायावतींच्या सरकारने आम्हाला नोकरी आणि आरक्षण मिळवून दिले, असंही ते म्हणालेत. परंतु भाजपाने हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा निवडणुका घेतल्यानंतर त्याचा बसपाला सर्वाधिक फटका बसला. बसपाकडून भाजपाला पराभूत करण्याची जोरदार संधी असल्याची खात्री पटल्यावरच अल्पसंख्याक समुदाय पक्षाला मत देतो. आग्रा लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पाचपैकी एक असलेल्या एतमादपूर विधानसभा मतदारसंघातील जाटव असलेले रमेश चंद्र सांगतात की, भाजपा सुपर सरकार आहे. आम्ही अनेक केंद्रीय योजनांचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे चंद हेसुद्धा बसपाचे मतदार आहेत, तरीही बसपा निवडणुकीत का पराभूत होते याबद्दल त्यांना आश्चर्य वाटते. आम्ही सगळे बसपाला मत देतो तरीही भाजपा जिंकतो. ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड आहे. निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणूक होणे आवश्यक आहे,” असेही ते म्हणतात.
सपा-काँग्रेस आणि बसपा या दोन्ही पक्षांनी जाटवांना उमेदवारी दिल्याने सुमारे २ लाख मुस्लिम मते निर्णायक ठरू शकतात. मुस्लिम बहुसंख्य सपा-काँग्रेसच्या युतीबरोबर असल्याचे दिसत आहे, परंतु बसपा त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. “२०२२ मध्ये योगी आदित्यनाथ यांनी मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय केले. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या. मुस्लिमाच्या नावे नाव का ठेवता येऊ शकत नाही?” असा सवालही मोहम्मद सलीम यांनी विचारला. सपा सरकारने २०१६ मध्ये सुरू केलेला १४२ कोटी रुपयांचा प्रकल्प कोविड १९ महामारीच्या काळात थांबवण्यात आला होता आणि तेव्हापासून तो रखडला होता. या प्रकल्पासाठी सुमारे ९० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सध्याच्या सरकारने केवळ प्रकल्पाचे नाव बदलले आहे,” असंही तिथले मतदार सांगतात. मुस्लिम समुदायामध्येही झटपट तिहेरी तलाकवर बंदी घालण्यासारख्या मोदी सरकारच्या उपाययोजनांबद्दल कौतुक होत आहे. आग्रा कॅन्टोन्मेंटमधील रहिवासी नादिरा म्हणते की, भाजपाने लोकांना जातीय आधारावर विभागले आहे. लोकही मुस्लिम समाजाविषयीच्या वाढत्या द्वेषासाठी भाजपाला दोष देत आहेत.
हेही वाचाः भाजपा नेत्यांनाही नकोयत ३७० खासदार!
बसपाचे उमेदवार पूजा अमरोही (५१) या काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार सत्या बेहान यांची कन्या आहेत, त्या आतापर्यंत सामाजिक कार्यात कार्यरत होत्या. अमरोही म्हणतात की, बसपाला दलितांची तळमळ आहे. त्यांच्यासाठी बेरोजगारी, शिक्षण, सुरक्षा आणि शुद्ध पिण्याचे पाणी हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. मी आग्रा येथे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या स्थापनेचे समर्थन करीत आहे, असंही त्या सांगतात. चपलांचे व्यापार करणाऱ्या समुदायातील कर्दम सांगतात की, या मतदारसंघातील मतदारांमधील सर्वात महत्त्वाचा भाग चपलांचे व्यापारी असून, ते सपाचे मतदार आहेत. भाजपा सरकारने सर्वसामान्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने जनता निराश झाली आहे आणि सपा-काँग्रेसच्या युतीच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. जाटव जाहीरपणे बसपाला पाठिंबा देणार असल्याचं सांगत असले तरी ते आम्हाला मत देतील,” असंही कर्दम सांगतात. ६३ वर्षीय कर्दम हे राजकारणात नवीन नाहीत आणि त्यांनी २००० मध्ये बसपाचे उमेदवार म्हणून आग्रा महापौरपदाची निवडणूक लढवली. सपाचे प्रमुख अखिलेश यादव फेब्रुवारीमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सामील झाले तेव्हा आग्रावर लक्ष केंद्रित केले होते.
दुसरीकडे बघेल यांनी गेल्या काही वर्षांत आग्रा येथे केलेले काम आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या आधारे पुन्हा जागा जिंकण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. आग्रामधील लोक मला वैयक्तिकरित्या ओळखतात, परंतु सपा आणि बसपाच्या उमेदवारांबद्दल त्यांना माहिती नाही. ही निवडणूक २०१९ च्या निवडणुकीपेक्षा सोपी आहे,” असाही ते दावा करतात. २५ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रा आणि लगतच्या फतेहपूर सिक्री मतदारसंघातील भाजपा उमेदवारांसाठी एका सभेला संबोधित केले. सपाचे राज बब्बर यांनी १९९९ आणि २००४ मध्ये आग्रा जागा जिंकली होती. तेव्हापासून भाजपाने ती तीनदा जिंकली आहे (२००९, २०१४ आणि २०१९). २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये अनुक्रमे ३१.४८ टक्के, ५४.५ टक्के आणि ५६.४ टक्के मते मिळवून भाजपाने या जागेवर आपला मतांचा वाटा उत्तरोत्तर वाढवला आहे.