संतोष प्रधान
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला रोखण्याचे आश्वासन देत वाटचाल करणाऱ्या व नऊ महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये सत्तेत आलेल्या आम आदमी पार्टीच्या दोन मंत्र्यांना आतापर्यंत गैरव्यवहारांच्या आरोपांवरून राजीनामा द्यावा लागल्याने ‘आप’च्या प्रतिमेला धक्का बसला आहे.
पंजाब सरकारमधील फलोत्पादनमंत्री फौजासिंग सरारी यांना गैरव्यवराहांच्या आरोपांतून राजीनामा द्यावा लागला. खंडणी वसूलीबाबत त्यांची ध्वनिफित काही काळापूर्वी समाज माध्यमातून वितरित झाली होती. तेव्हापासूनच सरारी हे वादग्रस्त ठरले होते. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार सत्तेत येताच काहीच दिवसांमध्ये आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. आरोग्यमंत्र्यांवरही पैसे वसूलीचा आरोप झाला होता.
आम आदमी पार्टी गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला थारा देणार नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे वारंवार सांगत असतात. पण पंजाबमध्ये सत्तेत येताच अवघ्या नऊ महिन्यांमध्ये दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. या दोन्ही मंत्र्यांवर खंडणी वसूली किंवा ठेकेदाराकडून पैसे उकळण्याचा आरोप झाला होता. अन्य पक्ष आणि आम आदमी पार्टीच्या मंत्र्यांमध्ये काहीही फरक नाही हाच संदेश त्यातून गेला आहे.
सरारी यांनी वैयक्तिक कारणावरून राजीनामा दिल्याचा दावा आम आदमी पार्टीने केला आहे. पण स्वच्छ कारभाराचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या आम आदमी पार्टीच्या दोन मंत्र्यांना खंडणी वसूलीच्या आरोपावरून घरी जावे लागल्याने पक्षाची चांगलीच अडचण झाली आहे. दिल्लीत पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना अटकेनंतर तिहार कारागृहात कशी चांगली वागणूक दिली जात आहे याची चित्रफित प्रसिद्ध झाल्यावरही वाद निर्माण झाला होता.