मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱ्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे संघटनेत ऊर्जा निर्माण झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी भाजप सज्ज आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन महाविकास आघाडीने खोट्या प्रचारामुळे सामान्य जनतेच्या मनात निर्माण केलेला संभ्रम दूर करतील. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या कामगिरी व निर्णयांची जनतेला माहिती देतील, असे बावनकुळे यांनी नमूद केले.

Amit Shah on two days tour of the state print politics news
अमित शहा आजपासून दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर; मोदी गुरुवारी पुण्यात
26th September Rashi Bhavishya & Panchang
२६ सप्टेंबर पंचांग: दिवसाच्या सुरुवातीला ‘या’ राशींना होणार…
Who is BJP face for Delhi poll campaign Smriti Irani
Smriti Irani for Delhi CM: अमेठीत पराभव आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार, भाजपा दिल्लीची सूत्रे स्मृती इराणींच्या हाती देणार?
Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट
mahayuti will contest assembly elections under the leadership of cm eknath shinde says ajit pawar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक; अजित पवार यांची माहिती
Uddhav Thackeray, Sangli meeting, Shivsena,
सांगलीच्या मेळाव्याकडे उद्धव ठाकरे यांची पाठ, शिवसेना जाणीवपूर्वक दूर
Extension of time to Ravindra Waikar to clarify his position on Amol Kirtikar petition print politics news
कीर्तिकरांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी वायकर यांना मुदतवाढ
Rajendra Gavit, Palghar Assembly Constituency,
राजेंद्र गावित पालघरसाठी आग्रही

हेही वाचा >>>महायुतीमध्ये बाळापूर मतदारसंघ कळीचा मुद्दा

शहा यांनी २४ व २५ सप्टेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात संघटनात्मक बैठका घेतल्या. त्यांनी या दौऱ्यामध्ये सुमारे पाच हजार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय असावा आणि महायुतीच्या विजयासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कसे काम करावे, याविषयी शहा यांनी मार्गदर्शन केले. शहा यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातील, असे बावनकुळेंनी सांगितले.