नीलेश पानमंद

ठाणे : शिवसेनेतील फुटीनंतर ठाणे जिल्ह्यात झालेल्या पडझडीनंतर ठाकरे गटाने आता पक्षाची पुनर्बांधणी करत पक्षवाढीवर लक्ष दिले असून त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपखडी मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. शिंदे यांचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे संजय घाडीगांवकर यांची घरवापसी करत ठाकरे गटाने त्यांच्या माध्यमातून शिंदे यांच्या विरोधात आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. घाडीगांवकर यांचा पक्षाला किती फायदा होतो, हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Eknath Shinde Group , Pratap Sarnaik,
स्बळाच्या नाऱ्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टिकेचे बाण
Pratap Sarnaik Thackeray Group
Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”

शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून मुंबईत दसरा मेळावा आयोजित करून शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. त्यापाठोपाठ शिवसेनेतील फुटीचा आणि राज्यातील सत्ताबदलाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे शहरात महाप्रबोधन यात्रा आयोजित करून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. आम्ही २००४ मध्ये मोठी चूक केली आणि आता ती सुधारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कोपरी पाचपखाडी आणि ओवळा माजीवडा मतदारसंघात आनंद दिघे यांच्या सच्चा शिवसैनिकांना निवडून आणण्याचा निर्धार करा, असे आवाहन शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मेळाव्यात केले होते. या आवाहनानंतर ठाकरे गटाची जिल्ह्यात खिंड लढविणारे राजन विचारे यांनी जिल्ह्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखडी मतदार संघावर लक्ष केंद्रित केले असून या भागातील शिंदे यांच्या विरोधकांना हेरून त्यांना पक्ष प्रवेश देण्याची मालिका सुरू केली आहे.

हेही वाचा : ‘भारत जोडो’ यात्रेतील आकर्षण एकच!

त्यातूनच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखडी मतदारसंघातील त्यांचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे संजय घाडीगावकर यांची घरवापसी करत ठाकरे गटाने त्यांच्या माध्यमातून शिंदे यांच्या विरोधात आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. क्लस्टर योजनेतील त्रुटीवरून त्यांनी शिंदे यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. घाडीगांवकर यांच्यावर दोनदा हल्लेही झाले आहेत. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात ते कट्टर शिंदे विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांचा पक्षाला किती फायदा होतो, हे येत्या काळातच स्पष्ट होईल. या सर्वात खासदार राजन विचारे हे नेमकी काय भूमिका घेतात आणि त्यांचा पक्षवाढीसाठी कसा उपयोग करून घेतात, यावर वागळे इस्टेट भागात ठाकरे गटाचे भवितव्य ठरणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे मतदार संघावर एकहाती वर्चस्व असून त्यामुळे ठाकरे गटालाही त्यांच्यापुढे आव्हान निर्माण करण्याची लढाई तूर्तास तरी सोपी नसल्याचे दिसून येते.

हेही वाचा : अंधेरीतील भाजपची माघार : पराभवाची भीती आणि विजयाचे हिशेब

संजय घाडीगांवकर यांनी १९९७ मध्ये राजकीय प्रवासाला सुरुवात केली. १९९७ ते १९९९ या कालावधीत ते भारतीय विद्यार्थी सेनेचे वागळे इस्टेट विभागात कार्यरत होते. १९९९ ते २००५ या कालावधीत ते किसननगर भागातील शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख होते. ३० जुलै २००५ मध्ये पदाचा राजीनामा देऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१२ ते २०१६ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. २०१५ ते २०१६ या कालावधीत काँग्रेस पक्षाचे गटनेते होते. २०१६ मध्ये त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. २०१६ मध्ये किसननगर भागातील पोटनिवडणुकीत त्यांनी शिवसेनेचा पराभव करत स्वाती अनिल देशमुख या सामान्य महिलेला निवडून आणले होते. त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

हेही वाचा : विश्लेषण: पुण्यात अचानक इतका पाऊस का पडला? तब्बल ३३९ टक्के अतिरिक्त पाऊस पडण्यामागे कारण काय?

२०१७ मध्ये ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुक लढले. त्यावेळी त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपमधून निवडणुक लढविली होती. त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१९ मध्ये ते कोपरी पाचपखाडी मतदार संघातून शिंदे यांच्याविरोधात निवडणुक लढण्यासाठी इच्छूक होते. परंतु ऐनवेळेस शिवसेना आणि भाजपची युती झाल्याने त्यांनी भाजपपासून फारकत घेत अपक्ष निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केली होती. उमेदवारी दाखल करण्याच्या नऊ दिवस आधी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याची तयारी दाखविली आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर या प्रभागातून निवडणूक लढविली. त्यात त्यांनी २९ हजारांच्या आसपास मते घेतली होती.

Story img Loader