सांगली : सांगली विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी वसंतदादा घराण्यातील स्व. मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी केली असल्याचे सांगत असतानाच वेळ प्रसंगी आपण बंडखोरीचा पर्यायही खुला ठेवला असल्याचे आवर्जून सांगितले. यामुळे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा ठाकणार आहे. खासदार विशाल पाटील आणि माजी राज्यमंत्री आ. डॉ. विश्‍वजित कदम यांच्या समोर धर्मसंकट उभे राहणार आहे. दुसर्‍या बाजूला भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ हे तिसर्‍यांदा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले असताना पक्षातूनच असलेली नाराजी आणि शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी जनतेत जाऊन सुरू केलेली प्रचार मोहिम त्यांना अडचणीची ठरू पाहत आहे.

जिल्ह्याचे ठिकाण असल्याने सांगली मतदार संघातून निवडून येण्यासाठी अनेक दिग्गज नेते इच्छुक असतात. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपने सलग दुसर्‍यांदा विजय मिळवत असताना मतदारांचा विश्‍वास काही प्रमाणात गमावला असल्याचे दिसून आले. भाजपचे गाडगीळ यांना ४९.६३ टक्के म्हणजेच ९३ हजार ६३६ मते मिळाली, तर चुरशीच्या लढतीत काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांना ४५.९५ टक्के म्हणजे ८६ हजार ६९७ मते मिळाली. तर नोटाला २ हजार ४४८ मते मिळाली होती. केवळ ६ हजार ९३६ मतांनी काठावरचा विजय भाजपला मिळाला. दादा घराण्यातील कोणीही उमेदवार नसल्याने जयंत पाटील समर्थक राष्ट्रवादीने काँग्रेसचे मनापासून काम केले. यामुळे भाजपचे मताधिक्य कमी करण्यात यश आले.

delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Pune voters supported BJP in elections but BJP ignored and cheated punekars Former Congress mla mohan Joshis allegation
भाजपने पुणेकरांची फसवणूक केली? काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांचा आरोप
संजय राऊतांच्या विधानाने युतीच्या चर्चेला बळ
Congress to help Aam Aadmi Party against BJP in final phase
अखेरच्या टप्प्यात ‘आप’च्या मदतीला काँग्रेस?
Raigad Guardian minister post , Aditi Tatkare ,
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना – राष्ट्रवादीत खडाखडी 
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Ramdas Athawale appeal Sharad Pawar NDA
शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावे – रामदास आठवले यांचे आवाहन

हेही वाचा…मुख्यमंत्रीपदावरून शरद पवारांच्या भूमिकेने महाविकास आघाडीतील तिढा वाढला

यावेळची राजकीय स्थिती वेगळी आहे. गतवेळी पक्षाने थांबण्यास सांगितले म्हणून आपण थांबलो, आता या मतदार संघातील उमेदवारीवर आपलाच हक्क असल्याचे सांगत श्रीमती पाटील यांनी दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना मिळालेले सांगलीतील मताधिक्य १९ हजार १९२ चे आहे. भाजपच्या दृष्टीने ही धोक्याची पूर्वसूचना असल्याचे निदर्शक मानावे लागेल. नेमका याचाच लाभ उठविण्याचा प्रयत्न त्यांचा दिसतो आहे. तर पृथ्वीराज पाटील यांनी शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद हाती असतानाही अन्य कार्यकत्यार्र्ंसाठी कोणत्याही पदाची नियुक्ती अथवा निवड केलेली दिसत नाही. काँग्रेसचा कार्यकर्ता तळागाळापर्यंत असल्याचे सांगितले जात असले तरी पदाधिकारी पदासाठी एकही कार्यकर्ता सापडला नाही का? त्यांच्या व्यतिरिक्त पक्षात अन्य पदे असू शकत नाहीत का असे सवाल विचारले जात आहेत. दुसर्‍या बाजूला श्रीमती पाटील मदन पाटील युवा मंचच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असतात.

यावेळी कोणत्याही स्थितीत निवडणूक लढविणारच असे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये उमेदवारीचा टोकाचा संघर्ष दिसणार आहे. गेली दहा वर्षे आमदारकीची स्वप्ने पाहणार्‍या आणि गत निवडणुकीत निसटता पराभव झालेल्या पाटलांचे मग काय होणार? खासदार पाटील कोणती भूमिका घेणार, बंडखोरी झालीच तर ते कोणाच्या पाठीशी राहणार हेही महत्वाचे ठरणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व करणारे डॉ. कदम कोणती भूमिका घेणार . श्रीमती पाटील यांचे जावई डॉ. जितेंद्र कदम हे कदम घराण्यातील म्हणजेच माजी आमदार मोहनराव कदम यांचे नातू आहेत. पै-पाहुण्यांचे संबंध असल्याने त्यांची भूमिका काय असेल हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा…‘लाडकी बहीण’ योजनेतून दर वर्षी ४६ हजार कोटींची मदत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

गेल्या दहा वर्षात आमदार गाडगीळ यांनी विकास कामांसाठी निधी आणला, हरिपूरचा पूल, आयर्विनला पर्यायी पूल आदी कामांसाठी आग्रह धरला, निधी मिळवला, मात्र सांगली महापालिकेच्या कारभारात त्यांनी फारसे लक्ष घातले नाही. यातून विस्तारित भागातील नागरी समस्यांचा डोंगर अद्याप कायम आहे. विशेषत: पावसाळ्यातील नरकयातना नागरिकांना आजही भोगाव्या लागतात. याकडे त्यांनी हवे तेवढे लक्ष दिले नाही. माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी एकीकडे भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू ठेवले असतानाच दुसर्‍या बाजूला प्रचाराचा धडाका लावला आहे. कोणत्याही स्थितीत मैदानात उतरायचेच यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. याशिवाय पक्षाने उमेदवारीसाठी आपल्या नावाचा विचारही करावा असे पक्षिय पातळीवर शेखर इनामदार याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप अंतर्गत असलेल्या नाराजीचा लाभ घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होतो की बंडखोर काँग्रेसकडून होतो हे ऐन रणांगणातच दिसणार आहे.

Story img Loader