मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखे लंडनच्या व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालयातून तीन वर्षांसाठी राज्यात आणण्यात येत असून येत्या १९ जुलै रोजी ती सातारा येथील शासकीय शस्त्रसंग्रहालयात ठेण्यात येणार आहेत. देशातील हजारो इतिहासकारांपैकी केवळ एकाच इतिहासकारांनी या वाघनखांबाबत आक्षेप घेतला असला तरी ही वाघनखे महाराजांचीच असल्याचा पुनरुच्चार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘सीए’ परीक्षेत मुंबईतील दोघांचा तिसरा क्रमांक; नवी दिल्लीतील शिवम मिश्रा प्रथम तर वर्षा अरोरा द्वितीय

महायुती सरकारने लंडनच्या व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालयातून राज्यात आणत असलेली वाघनखे ही शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केला आहे. विशेष म्हणजे लंडनच्या व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालयानेही शिवाजी महाराजांनी अफझल खानाच्या वधासाठी वापरलेली हीच वाघनखे होती असा दावा कधीही केला नसल्याचे म्हटले आहे. त्यावरून या वाघनखांबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेच्या पार्श्वभूमीवर सरकारने खुलासा करण्याची मागणी भाजपचे रणजित सावरकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली. त्यावर बोलताना मुनगंटीवार यांनी हा दावा केला.

बऱ्याच वर्षांपासून लंडनच्या व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालयातात असलेली शिवाजी महाराजांची वाघनखे आणि महाराजांशी सबंधित वस्तू राज्यात आणण्याची मागणी शिवप्रेमींकडून होत होती. त्यानुसार राज्य सरकारने या संग्रहालयाशी करार करून तीन वर्षांसाठी ही वाघनखे राज्यात आणण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार ही वाघनखे येत्या १९ जुलैपासून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शित केली जाणार असून जनतेला त्याचे दर्शन घेता येईल. यासोबतच या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रे प्रदर्शित करणाऱ्या एका शस्त्र दालनाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. वाघनखे आणण्याकरिता कोणतेही भाडे दिले जाणार नाही. तसेच ही वाघनखे आणण्यासाठी १४ लक्ष आठ हजार रुपयांचा खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar defends authenticity of shivaji maharaj waghnakh print politics news zws