चंद्रपूर येथील राजुरा ग्रीनफिल्ड विमानतळ हा या भागाच्या औद्योगिक विकासासाठी तसेच पर्यटनासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या विमानतळ उभारणीचे काम गतीने पूर्ण करावे असे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. विधान भवनात यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्याघ्र संवर्धनात अडचणी निर्माण होऊ नयेत याकरता उपाययोजना आखावी.  चंद्रपूर जिल्हा व परिसराच्या औद्योगिक विकासासाठी हा विमानतळ फार महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर येथील वन पर्यटन, पर्यावरण व व्याघ्र संवर्धन, आणि आदिवासींच्या वनोत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठीही या विमानतळाचा मोठा उपयोग होणार आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

वन्यजीव मंडळाच्या ऑक्टोबरमधील नियोजित बैठकीत या विमानतळासंदर्भातील सर्व परवानग्या मिळविण्याचा आदेश त्यांनी यावेळी संबंधित अधिकारीवर्गाला दिला.या प्रस्तावित विमानतळाच्या धावपट्टीची लांबी आणि त्यापलीकडील सुरक्षा क्षेत्र यासंदर्भात निर्माण झालेल्या समस्यांवरही आजच्या बैठकीत तोडगा काढण्यात आला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar ordered officer to increase the speed of chandrapur airport work print politics news pkd
Show comments