महेश सरलष्कर

राष्ट्रीय सचिव पदावरून सुनील देवधर व महासचिव पदावरून सी. टी. रवी यांची उचलबांगडी केली आहे. देवधर यांच्याकडील आंध्र प्रदेशचे प्रभारी पद कायम ठेवले आहे. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत सी. टी. रवी पराभूत झाले होते. त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या प्रभारी पदाची जबाबदारीही काढून घेतली जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेतृत्वावर नाराज असल्याची सातत्याने चर्चा होत असलेल्या पंकजा मुंडेंना मात्र सचिवपदी कायम ठेवण्यात आले आहे.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
dcm devendra fadnavis praise obc community
भाजपच ओबीसींच्या पाठीशी!, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव

नड्डांनी पक्षाध्यक्षपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर, कार्यकारिणीच्या पहिल्या फेरबदलामध्ये विनय सहस्रबुदधे यांना उपाध्यक्ष पदाच्या यादीतून वगळण्यात आले होते. त्यानंतर उपाध्यक्षपदी महाराष्ट्रातून एकाचीही वर्णी लागलेली नाही. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये पुढील चार महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे व छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांना उपाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. राजस्थानमध्ये भाजपला विजयाचा आशा असून केंद्रीय नेतृत्वाने अखेर वसुंधरा राजेंशी असलेले मतभेद दूर करण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तेलंगणाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी झालेले संजय बंडी यांचे केंद्रात पुनर्वसन केले जाईल असे सांगितले जात होते, त्यानुसार, त्यांना महासचिव केले आहे.

हेही वाचा >>> भाजप आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या मैत्रीत अंतर?

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना उपाध्यक्ष पदावरून हटवले असले तरी, राज्यात चौहान हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहेत. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता असताना चौहान यांना उपाध्यक्ष केले होते. मात्र, केंद्रीयमंत्री नरेंद्र तोमर यांना मध्य प्रदेशच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे समन्वयक करून मोदी-शहांनी चौहान यांच्यावर दबाव कायम ठेवला आहे. उत्तर प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पसमंदा मुस्लिमांना उमेदवारी देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत पसमंदा मुस्लिमांची अधिकाधिक मते मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू व उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेचे सदस्य डॉ. तारिक मंसूर यांना भाजपने उपाध्यक्षपदी नियुक्त केले आहे. मंसूर हे पसमंदा मुस्लिम आहेत. भाजपने पहिल्यांदाच पसमंदा मुस्लिमांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये प्रतिनिधित्व दिले आहे.

हेही वाचा >>> वैद्यकीय महाविद्यालयावरून वर्धा जिल्ह्यातील राजकारण तापले

राज्यसभेतील भाजपचे मुख्य प्रतोद व उत्तर प्रदेशमधील सुमारे १० टक्के ब्राह्मण समाजातील बलाढ्य नेते लक्ष्मीकांत वाजपेयी यांचीही उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे. मंसूर व वाजपेयी यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देऊन भाजपने उत्तर प्रदेशातील उच्चवर्णीय व मुस्लिम समीकरण अधिक भक्कम केले असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेस वा अन्य पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना महत्त्वाची पदे दिली जात असल्याची चर्चा होते. माजी संरक्षणमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अॅण्टनी यांचे पुत्र अनिल अॅण्टनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही महिन्यांमध्ये त्यांची राष्ट्रीय सचिवपदी वर्णी लागली आहे. २००२ मधील गुजरात दंगलीवर ‘बीबीसी’ने प्रसारित केलेल्या लघुचित्रपटानंतर अनिल अॅण्टनी यांनी काँग्रेस नेतृत्वाविरोधात भूमिका घेतली होती व ‘बीबीसी’च्या कार्यालयावरील छाप्यांचे समर्थन केले होते. अॅण्टनी केरळचे असून तिथे भाजपने पक्षविस्तारासाठी लक्ष केंद्रीत केले आहे. प्रकाश जावडेकर यांना केरळचे प्रभारी करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पावसाळी अधिवेशनावर फडणवीस यांचीच छाप

महाराष्ट्रातून विनोद तावडे यांना महासचिवपदी कायम ठेवण्यात आले आहे. तावडे लोकसभेच्या १६५ मतदारसंघांच्या ‘प्रवासी लोकसभा’ प्रकल्पाचे समन्वयक असून त्यांच्याकडे बिहारची जबाबदारीही देण्यात आली आहे. तावडे सध्या राष्ट्रीय राजकारणात अधिक सक्रिय आहेत. विजया रहाटकर या सचिवपदी कायम आहेत. राज्यातील राजकारणात कोंडी झाल्यामुळे नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांनी दिल्लीत येऊन सोनिया गांधींची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. या वावड्यांकडे दुर्लक्ष करत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पंकजा यांना सचिवपदी कायम ठेवले असून त्या मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पंकजा मुंडेंना अभय दिल्याचे मानले जात आहे. नड्डांच्या चमूतील काही सदस्यांनी लोकसभेची एकही निवडणूक जिंकलेली नाही वा एखादा खासदार निवडणूक आणण्याच्या त्यांच्या क्षमतेवरही शंका घेतली जाते. तरीही, अरुण सिंह, कैलाश विजयवर्गीय, दुष्यंत कुमार गौतम, तरुण चुग यांच्या महासचिवपदाला धक्का लावलेला नाही. कर्नाटकमधील पराभवानंतर बी. एल. संतोष यांच्याबद्दल पक्षांतर्गत नाराजी असल्याचे सांगितले जात होते पण, पडद्यामागील सूत्रधार म्हणून संतोष यांच्याकडे संघटनेचे महासचिव व शिवप्रकाश यांच्याकडे संघटनेचे सह-महासचिव पदाची जबाबदारी कायम राहिली आहे.