अविनाश कवठेकर

युवकांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि मतदारसंघातील कामाचा धडाका अशी ओळख असलेले पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगांवशेरीचे आमदार सुनील टिंगरे यांची ‘काम करणारा आमदार’ अशी अल्पावधीतच ओळख झाली आहे. स्पष्ट भूमिका आणि काम वेगाने करण्याच्या हातोटीमुळे आणि प्रश्नांची तिथल्या तिथे सोडवणूक ही त्यांची कार्यपद्धती युवक वर्गाचे आकर्षण ठरले आहेत.

Economic decline state government Sharad Pawar Vijay Wadettiwar criticize the government
आर्थिक घसरणीवरून राज्य सरकार लक्ष्य! शरद पवार, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय
maharashtra irrigation scam
विश्लेषण: सिंचन घोटाळा काय होता? त्यात अजित पवारांविरुद्ध गुन्हा का नाही?
Deputy Superintendent of Police Rekha Sankpal awarded Central Home Minister Vigilance Medal Nagpur news
पोलीस उपाधीक्षक रेखा संकपाळ यांना ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’; नागपुरातून बाळ विकणाऱ्या टोळीवर राज्यातील पहिला मकोका
Anil Deshmukh criticizes Ajit Pawar, Anil Deshmukh latest news, Ajit Pawar latest news,
अनिल देशमुखांची अजित पवारांवर टीका, म्हणाले, “ते फडणवीसांच्या मांडीवर बसल्याने आबांवर…”
lokjagar bacchu kadu and prakash ambedkar role in maharashtra assembly
लोकजागर : साटेलोट्यांचे ‘शिलेदार’!
six ambedkarite parties
सहा आंबेडकरी पक्ष-आघाड्या विधानसभेच्या मैदानात

हेही वाचा… अवंतिका लेकुरवाळे : समाजकारणातून राजकारणात

सुनील टिंगरे राजकारणात आले ते ओघानेच. बांधकामासंदर्भात कामे घेण्याचा सुनील टिंगरे यांचा मूळ व्यवसाय. सन २००७ मध्ये पहिल्यांदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. नगरसेवकपदाच्या पहिल्या पाच वर्षांतच त्यांनी शेकडो कोटींची विकासकामे प्रभागात केली. सर्वाधिक निधी खर्च करणारा नगरसेवक अशी त्यांची ओळख निर्माण झाली. प्रभागात कुठेही जा, त्यांच्याभोवती युवा वर्गाचा कायमच गराडा राहिला. टिंगरे आमदार झाल्यानंतरही त्यात फारसा फरक पडलेला नाही. मतदारसंघावर बारीक लक्ष असलेले सुनील टिंगरे रात्री अपरात्रीही मतदारसंघातील समस्या जाणून घेण्यासाठी फिरत असतात.

हेही वाचा… रामचंद्र तिरुके : कुशल संघटक

वडगांवशेरी मतदारसंघ संमिश्र लोकवस्तीचा. त्यांच्या प्रभागात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचेही जाळे आहे. तसेच उच्चभ्रू आणि झोपडपट्टीचा काही भागही मतदारसंघात आहे. त्यांच्याकडे समस्या किंवा प्रश्न घेऊन आलेल्या नागरिकांना ते नाराज करत नाहीत. काम होणारे असेल तर तोंडावर काम होईल, असे ते जाहीर सांगतात आणि हाती घेतलेल्या किंवा आश्वासन दिलेल्या कामांना गती देण्याचा प्रयत्न करतात, हीच त्यांची कार्यपद्धती. त्यांनी केलेल्या कामांमुळे ते सन २०१९ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून विजयी झाले. आमदार म्हणून काम करत वडगांवशेरीचा कायापालट करायचा आहे.

हेही वाचा… मनोज मोरे : प्रस्थापितांशी संघर्ष

शहराच्या पूर्व भागाला सातत्याने पाणीटंचाईला आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे भामा-आसखेड धरणातून या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सातत्याने बैठका, वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठपुरावा त्यांनी केला. त्यांच्या प्रयत्नामुळे रखडलेली योजना कार्यान्वित झाली आणि या भागाचा पाणीप्रश्न सुटला. वडगांवशेरी मतदारसंघात अनेक लहान-मोठ्या सोसायट्या, गृृहप्रकल्प आहेत. तिथे आमदार निधीतून कामे करण्यासाठी आमदार निधीचा वापर करता येत नव्हता. मात्र आमदार निधी खर्च करण्यास परवानगी द्यावी, यासाठी त्यांनी राज्यस्तरावर पाठपुरावा केला. राज्य शासनाने तसा धोरणात्मक निर्णय घेतल्याने त्यांच्या आमदार निधीतून शेकडो कोटींची कामे अनेक सोसायट्यांमध्ये झाली असून काही कामे प्रस्तावित आहेत. आमदार निधीतून कामे प्रस्तावित केल्यानंतरही अधिकारी त्याची कार्यवाही करत नसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांवर हक्कभंगाचा प्रस्तावही दाखल केला. माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्यांतील कर्मचारी आणि कंपन्यांच्या प्रश्नांचीही सोडवणूक करण्यात ते तेवढेच दक्ष आहेत.

हेही वाचा… डॉ. किरण लहामटे : अफाट जनसंपर्क

मतदारसंघातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठीही त्यांनी अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत. पर्यायी रस्त्यांसाठी पाठपुरावा केला आहे. अजित पवार यांचे विश्वासू आमदार अशी त्यांची ओळख आहे. पक्षाच्या ध्येय-धोरण आणि विकासासाठी झटणे यासाठी सातत्याने काम करायचे आहे, असे सुनील टिंगरे सांगतात.