देणगीदारांनी दिलेला निधी वैयक्तिक उपयोगासाठी वळवल्याच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी गाझियाबाद येथील विशेष पीएमएल कोर्टाने पत्रकार राणा अय्युब यांना समन्स बजावलेले आहे. याच समन्सविरोधात राणा अय्युब यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याच याचिकेवर येत्या २५ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

हेही वाचा >> Uddhav Thackeray And Prakash Ambedkar : ठाकरे गट-वंचितमधील युतीच्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आमच्या…”

Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
complaint with allegations against Ranjit Kamble says he is sand mafia and gangster
‘रणजित कांबळे हे रेती माफिया, गुंडागर्दी करणारे’, आरोपासह तक्रार
Vijay Wadettiwar, Bramhapuri Vijay Wadettiwar,
विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज अवैध? उच्च न्यायालय म्हणाले…

गाझियाबाद पीएमएलए कोर्टाने जारी केले समन्स

आपल्या या याचिकेत राणा अय्युब यांनी माझ्यावर कथित आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप मुंबईमधील आहेत. त्यामुळे गाझियाबाद कोर्टाच्या अधिकारक्षेत्रात हा खटला येत नाही. माझ्यावरील आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप चुकीचे असून गाझियाबाद पीएमएलए कोर्टाने बजावलेले समन्स रद्द करावे, अशी मागणी केली आहे. सक्तवसुली संचालनालयाने राणा यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीची गाझियाबाद येथील पीएमएलए कोर्टाने मागील वर्षी २९ नोव्हेंबर रोजी दखल घेतली होती. त्यानंतर कोर्टाने अय्युब यांना समन्स जारी केले होते.

हेही वाचा >> ठाकरे गट-वंचितच्या युतीची घोषणा, पण ‘फॉर्म्यूला’ काय? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट; म्हणाले “पुढची राजकीय वाटचाल…”

आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा २०२० मधील कलम ४५ तसेच कलम ४४ चा आधार घेत ईडीने राणा अय्युब यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलेले आहे. मागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या आरोपपत्रात राणा अय्युब यांनी देणगी म्हणून मिळालेले २.६९ कोटी रुपये खासगी संपत्ती म्हणून वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा >> “काँग्रेसचे नेते म्हणतात २६ जानेवारीला गांधींची हत्या, ‘क्या बात हैं प्यारे’”, असदुद्दीन ओवैसींचा हल्लाबोल, म्हणाले…

अय्युब यांनी या निधीतील ५० लाख रुपये बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून जमा केले. तसेच ५० लाख रुपये दुसऱ्या बँक खात्यात वळवले. मिळालेल्या निधीपैकी फक्त २९ लाख रुपयेच मदत कार्यासाठी वावरण्यात आले, असाही दावा ईडीने केला आहे.