पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार यांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अजित पवार यांच्यासह त्यांच्याबरोबर गेलेल्या ४० आमदारांना नोटीस बजावली. शिवसेनेच्या ठाकरे गटाने केलेल्या अशाच प्रकारच्या याचिकेपाठोपाठ या याचिकेवर सुनावणी घेण्याचेही न्यायालयाने मान्य केले.

१५ फेब्रुवारी रोजी नार्वेकर यांनी अजित पवार गट हाच खरा पक्ष असल्याचा निर्णय दिला होता. त्याला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने याची नोंद घेत अजित पवार गटाच्या आमदारांना नोटीस बजावली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षनाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णयाविरोधातही शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे यापूर्वीच दाद मागितली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court notice to ajit pawar group petition against the decision of the assembly speaker amy