लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव : लोकसभा निवडणुकीत यांना बहिणी आठवल्या नाहीत, तर निकालानंतर आठवल्या. कोणतीच बहीण लाडकी नाही, त्याचा अनुभव मला अधिक असल्याचा दावा करत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे शनिवारी दुपारी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघस्तरीय महिला मेळावा घेण्यात आला, या मेळाव्यात खासदार सुळे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुतीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. निवडणूक व मतदानावेळी सरकारमधील भावांना महिलांची आठवण येते. इतरवेळी मात्र पक्ष आणि घर फोडाफोडी हेच उद्याोग केले जातात. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना पैसे मिळत असतील तर आम्हाला आनंदच आहे. पण त्यासाठी कोणी त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर ते एकदम चुकीचे आहे. कोणतीही नाती ही भीतीने नाही तर प्रेमाने निर्माण होतात. महायुतीच्या सरकारची दडपशाही हद्दपार करण्याची वेळ आता आली आहे, असे त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule criticizes ajit pawar over chief minister ladki bahin yojana print politics news amy