Prajakta Mali vs Suresh Dhas: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. २२ हून अधिक दिवस उलटूनही या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अद्याप पकडले गेलेले नाहीत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांकडे बोट दाखविले जात आहे. तसेच बीडमधील सर्वपक्षीय आमदारांनी या प्रकरणाच्या माध्यमातून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण-भावाला राजकीय लक्ष्य केले. एकेकाळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे सहकारी असलेल्या सुरेश धस यांनी आक्रमकपणे या हत्या प्रकरणात आतापर्यंत भूमिका मांडली. मात्र २७ डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्याच्या नादात त्यांनी सेलिब्रिटींचा नामोल्लेख केला. त्यात मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे नाव घेतल्यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली. आता या प्रकरणात भाजपाच्या काही नेत्यांनी सुरेश धस यांची कान टोचले आहेत.

महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडण्याच्या आधी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या हत्येनंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिले जाऊ नये, यासाठी महायुतीमधूनच प्रयत्न झाले. स्वराज्य पक्षाचे नेते, माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी तर जाहीरपणे ही भूमिका मांडली. तरीही धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले गेले. त्यानंतर २१ डिसेंबर पासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनात बीड जिल्ह्यातील भाजपाचे आमदार सुरेश धस आणि नमिता मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे संदीप क्षीरसागर यांनी जोरदार भूमिका मांडली. जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणात धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले.

MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार झालेला कृष्णा आंधळे कोण? सुरेश धस यांनी दिली महत्त्वाची माहिती
pil filed in High Court demanding ED inquiry into Valmik Karad accused in Santosh Deshmukhs murder
वाल्मिक कराडच्या आर्थिक व्यवहारांच्या ईडी चौकशीचे आदेश द्या, जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात मागणी
people need protection who do wrong thing says Shivendrasinh raje
जे चुकीचं काम करतात त्यांना संरक्षण लागते- शिवेंद्रसिंहराजे
Akshay Kumar
अक्षय कुमारची सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया; म्हणाला, “कुटुंबाचे संरक्षण…”

हे वाचा >> Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी मांडली भूमिका; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…

धनंजय मुंडे यांना सर्वपक्षीय नेते लक्ष्य करत असताना आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सवर बोट ठेवले. मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वीटभट्ट्या, जमिनी बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला. या पैशांतून इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स केले जाते. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना परळीत आणले जाते. जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे, असे विधान सुरेश धस यांनी केले. यानंतर आता वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे.

सुरेश धस यांच्या विधानावर भाजपामधून नाराजी

सुरेश धस यांच्या आक्रमक पवित्र्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले असून त्यांनी धस यांना सबुरीने घेण्याचा संदेश दिला. “धस यांच्या मनात काही शंका असतील तर त्यांनी सरकारकडे मांडाव्यात. पण तपासावर परिणाम होईल, असे विधान करू नये”, अशी समज बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तर भाजपाचे दुसरे मोठे नेते चंद्रकांत पाटील यांनी तर थेट त्यांना खडे बोल सुनावले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, राजकीय-सामाजिक वाद सुरू असताना त्यात अभिनेत्रींचे नाव जोडणे योग्य नाही. सुरेश धस माझे मित्र आहेत. मी दोन दिवस राज्याबाहेर होतो. पण आता त्यांना फोन करून याबाबत बोलणार नाही. कुठल्याही महिलेची बदनामी होईल, असे विधान करता कामा नये. प्राजक्ता माळींनीही पत्रकार परिषद घेतलेली आहे.”

चित्रा वाघ यांचा प्राजक्ता माळी यांना पाठिंबा

दुसरीकडे भाजपाच्या विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनीही एक्सवर भूमिका मांडली असून सुरेश धस यांचे नाव न घेता प्राजक्ता माळी यांना पाठिंबा दिला आहे.

“स्त्रीचा सन्मान याला भाजपाचे सर्वोच्च प्राधान्य कायमच राहीले आहे. त्यामुळे कुणालाही कुणाचेही नाव घेऊन अशा पद्धतीने चिखलफेक करण्याचा अधिकार नाही. आपण सर्वांनी मिळून एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी कायम पुढाकार घेतला पाहिजे. या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

महिला आयोगानेही घेतली दखल

अभिनेत्री, लेखिका यांनी सुरेश धस यांच्या विधानाविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर या सध्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनीही या संदर्भात आज एक्सवर आपली भूमिका मांडली आहे.

“अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्याचा अभ्यास करून, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल”, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

Story img Loader