मुंबई : राज्यातील मतदानाची झारखंडमधील मदतानाशी तुलना करून गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र राज्यातील लोक संध्याकाळीच मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडतात. शेवटच्या दोन तासांत ७६ लाख मतदारांनी मतदान केल्याचा दावा केला जात असला तरी एक लाख मतदान केंद्रांचा विचार करता एका मतदान केंद्रावर फक्त ७६ लोकांनी मतदान केले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी नव्हत्या, असा दावा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केला.

हेही वाचा >>> टपाली मते, मतदान यंत्रांमधील मतांमध्ये तफावत कशी? शिवसेना ठाकरे गटाचा सवाल

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना दिल्लीकरांनी का नाकारलं? ‘आप’वर मतदार असमाधानी का होते? सर्वेक्षणातून समोर आली कारणं
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
फेरीवाल्यांना अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य का नाही? उच्च न्यायालयाची राज्य सरकार, महानगरपालिकेला विचारणा
Delhi assembly elections 2025 news in marathi
दिल्ली’साठी आज मतदान; तिरंगी सामन्यात मतटक्क्यावर सत्तेचे गणित
election commission status to cooperative election authority
सहकार निवडणूक प्राधिकरणाला आयोगाचा दर्जा
congress government analysis Telangana caste Survey
अन्वयार्थ : जनगणना कधी?
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
BJP vs Congress which political party has bigger bank balance
BJP vs Congress : भाजपा आणि काँग्रेस… दोन्ही पक्षांच्या बँक बॅलन्समध्ये नेमका फरक किती? निवडणूक आयोगाच्या डेटामधून समोर आली माहिती

राज्यात शेवटच्या दोन तासांत मतदानात झालेल्या वाढीवरून विरोधकांनी निवडणूक आयोगालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल आहे. टपाली मतदानाचा कल आणि मतदान यंत्रातील मतांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा शिवसेनेने (उद्धव ठाकरे) केला आहे, तर मतदानादिवशी संध्याकाळी पाच वाजताचे मतदान आणि दुसऱ्या दिवशी आयोगाने जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी यात ६.८३ टक्क्यांची वाढ असल्याचा आरोप काँग्रेसने केला. निवडणूक आयोगाने मात्र महाविकास आघाडीकडून करण्यात येणारे आरोप फेटाळले.

Story img Loader