सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात १५ हजार असंघटित कामगारांना घरांचा ताबा देण्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी सोलापुरात येत असतानाच दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी, आपणास आणि आपल्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव असल्याचे जाहीर करण्यामागे काही योगायोग आहे की काँग्रेसअंतर्गत दबावाचे राजकारण आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. आपल्या रक्तातच काँग्रेस असल्यामुळे आपण कदापि काँग्रेस सोडणार नाही, असे स्पष्टीकरणही शिंदे यांनी दिले आहे.

भाजपमध्ये प्रवेश करावा, असे आपल्याला प्रस्ताव आल्याचे शिंदे सांगत असले तरी त्यामागे काँग्रेसअंतर्गत दबावाच्या राजकारणाचा त्यांचा हेतू आहे का, याचीही प्रश्नार्थक चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यानिमित्ताने सोलापुरातील राजकीय वातावरण तापू लागल्याचे दिसून येते.

Eknath Shinde on Sanjay Raut
“वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंगं…”, संजय राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
shrikant shinde
कल्याणमध्ये महेश गायकवाड यांच्याकडून खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाची बॅनरबाजी
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
Ravindra Dhangekar met Deputy CM Eknath Shinde sparking rumors of joining Shinde group
मी वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेची भेट घेतली : माजी आमदार रविंद्र धंगेकर
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”

हेही वाचा – सुनावणीत विलंबासाठी शिंदे गटाची कायदेशीर खेळी ?

अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे एका काँग्रेस कार्यकर्त्याने आयोजिलेल्या ‘हुरडा पार्टी’ला शिंदे यांनी हजेरी लावली. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या समुदायासमोर बोलताना त्यांनी भाजपकडून आपणास आणि कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना प्रवेशासाठी प्रस्ताव आल्याचा गौप्यस्फोट केला. मात्र हा प्रस्ताव आपणास अजिबात मान्य नसल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. संपूर्ण हयात काँग्रेस पक्षात काढली. काँग्रेस आणि पक्षाचा विचार आमच्या रक्तात, नसा नसात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही. कन्या प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडत नाही आणि पडणारही नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांचा सोलापूर दौरा आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शिंदे यांना भेटणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी, सोलापूर लोकसभा निवडाणुकीत आपण सलग दोनवेळा पराभूत झालो तरी आपल्या एवढ्याच ताकदीच्या भाजप नेत्याकडून आपणास भाजप प्रवेशाचा प्रस्ताव आल्याचा गौप्यस्फोट केल्याचा हा चर्चेचा विषय झाला आहे. १९९६ आणि २००४ सालचा अपवाद वगळता सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जात होता. परंतु २०१४ आणि २०१९ साली सलग दोनवेळा काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपने पराभव केला. आता शिंदे यांनी वाढत्या वयोमानाचा आणि शारीरिक थकव्याचा विचार करून निवडणुकांच्या राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून २००९ पासून सलग तीनवेळा निवडून आल्या आहेत. आता त्यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आणि अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्या असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी सुशीलकुमार शिंदे हे सोलापुरात सक्रिय झाले आहेत.

मागील २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही शिंदे यांनी, आपणास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्ष प्रवेशाचा प्रस्ताव पाठविल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर आता पुन्हा दुसऱ्यांदा लोकसभा निवडाणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेशाचा प्रस्ताव आल्याचा गौप्यस्फोट करून काँग्रेसमधून कदापि बाहेर पडणार नाही, असा शिंदे यांनी निर्वाळा दिला असला तरी राजकारणात काहीही घडू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हेही वाचा – सुनावणीत विलंबासाठी शिंदे गटाची कायदेशीर खेळी ?

सध्या काँग्रेसच्या कोणत्याही महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत सुशीलकुमार शिंदे यांना स्थान दिले जात नाही. अलिकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळविल्यानंतर नेता निवडीसाठी शिंदे यांना पक्ष निरीक्षक म्हणून पाठविण्यात आले होते. तेवढाच त्यांचा पक्षातील सहभाग दिसून आला. काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे महत्त्व वाढत असताना पक्षात यापूर्वी त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा व्हायची. खरगे आणि शिंदे दोघेही काँग्रेसमधील दलित चेहरे असताना आता शिंदे यांचे महत्त्व घटल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजकीय वारसदार म्हणून कन्या आमदार प्रणिती शिदे यांनी सोलापूर लोकसभेची तयारी सुरू केली असतानाच अधूनमधून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्याही उठत आहेत.

भाजपने सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत करून शरद बनसोडे आणि डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे दोन खासदार दिले आहेत. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जात प्रमाणपत्र न्यायप्रवीष्ठ ठरल्यामुळे त्यांना पुनःश्च लोकसभेची संधी मिळण्याची खात्री नसल्याचे बोलले असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूर लोकसभेसाठी अधिक चांगला उमेदवार देण्याचे सूतोवाच केले आहे. त्याचा विचार करता अन्य पक्षातून चांगला उमेदवार भाजप आयातही करू शकतो, असेही बोलले जाते. या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांनी, आपणास भाजप प्रवेशाचा प्रस्ताव आल्याचा गौप्यस्फोट करण्यामागे काँग्रेसअंतर्गत दबावतंत्राचा हेतू असू शकतो का, याची प्रश्नार्थक चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते.

Story img Loader