लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने तमिळनाडूमध्ये पक्ष संघटनेत बदल केले आहेत. एका महत्त्वपूर्ण निर्णयात पक्षाकडून के. सेल्वापेरुंथागई यांची तमिळनाडू काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ते आता एस अलागिरी यांची जागा घेणार आहेत. काँग्रेस प्रमुखांनी एस अलागिरी यांच्या योगदानाचे कौतुक केले आहे. याशिवाय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांची तामिळनाडू विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती केली आहे. राजेश कुमार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. सेल्वापेरुंथगाई यांच्या नियुक्तीमुळे दलितांच्या प्रश्नांवर मांडलेली भूमिका आणि तमीळ राष्ट्रवादाशी त्यांचे भूतकाळातील संबंधांमुळे राज्यातील पक्ष नेत्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. “लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ इलमचे ते सहानुभूतीदार समजले जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा