मुंबई : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात रोहित पाटील यांच्या नावाचे चार उमेदवार रिंगणात आहे. दिवंगत आर. आर. यांचे पुत्र रोहित पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (शरद पवार) निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधकांनी ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तासगाव-कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात एकूण ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी १० उमेदवार विविध राजकीय पक्षांच्या वतीने निवडणूक लढवित आहेत. तर उर्वरित १३ उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरला आहे. रोहित पाटील शरद पवार गटाकडून तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून माजी खासदार संजय पाटील रिंगणात आहेत. या दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढाई होणार आहे, तरीही ‘रोहित पाटील’ या नामसाधर्म्यामुळे अन्य तीन उमेदवार चर्चेत आहे.

हेही वाचा :Mallikarjun Kharge: केवळ सवंग घोषणा नकोत! मल्लिकार्जुन खरगेंचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला

त्यापैकी नेहरूनगर (ता. तासगाव) येथील रोहित राजगोंडा पाटील, निमणी (ता. तासगाव) येथील रोहित राजेंद्र पाटील आणि दिवंगत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित रावसाहेब पाटील यांच्या नावाचाच चिंचणी येथील (ता. तासगाव) रोहित रावसाहेब पाटील हा आणखी एक तरुण निवडणूक रिंगणात आहे.

चिन्ह पोहोचवताना कसरत

निवडणूक रिंगणात असलेले संजय पाटील हेही चिंचणी गावचेच आहेत. आबांचे पुत्र ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. हे चिन्ह नवे आहे. मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचविताना त्यांची कसरत होत आहे, त्यात नाम साधर्म्य असलेल्या तीन उमेदवारांमुळे त्यांना आणखी कसरत करावी लागणार आहे.