Resort politics goes international ahead of trust vote against Visakhapatnam Mayor : राजकीय पक्ष विश्वासदर्शक ठराव मंडला जात असताना किंवा पक्ष फुटीच्या काळात त्यांच्या नेत्यांना दूरच्या रिसॉर्टमध्ये घेऊन गेल्याचे आपण अनेक वेळा पाहिले आहे. सत्ता स्थापनेच्या वेळी अशा गोष्टी सर्रास होताना दिसतात. मात्र आंध्रप्रदेशमधील तेलगु देसम पार्टी (टीडीपी) आणि वायआरएस काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी) हे दोन पक्षांनी ही पद्धत एका वेगळ्याच स्तरावर घेऊन गेले आहेत. १९ एप्रिल रोजी विशाखापट्टनमच्या महापौर जी हरी व्यंकट कुमारी यांच्याविरोधात अविश्वासदर्शक ठाराव मांडला जाणार असून या पार्श्वभूमीवर या दोन पक्षांनी चक्क त्यांच्या नगरसेवकांना मलेशिया आणि श्रीलंका येथे हलवले आहे.

ग्रेटर विझाग महापापालिकेवर (GVMC) सध्या वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वायएसआरसीपीची सत्ता आहे. कुमारी यांच्यासह उपमहापौर जे श्रीधप आणि के स‍तीश हे देखील वायएसआरसीपी पक्षाचे आहेत, पण गेल्या वर्षी राज्यातील सत्ता गेल्यापासून हे सर्व बॅकफूटवर गेले आहेत. वायएसआरसीपी मधील अनेक लहान-मोठे नेते हे सध्या टीडीपीमध्ये सामिल होताना दिसत आहेत.

या पार्श्वभूमीवर टीडीपी पक्षाचे GVMC मधील नगरसेवकांनी २२ मार्च रोजी कुमारी यांच्याविरोधात अविश्वासदर्शक ठराव दाखल केला आहे.

१९ तारखेला अविश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार आहे, यामुळे दोन्ही पक्षांनी मते फुटू नयेत किंवा क्रॉस व्होटिंग होऊ नये म्हणून त्यांच्या नगरसेवकांना दूर पाठवले आहे. वायआरसीपीकडे महापालिकेतील ९८ पैका ५९ जागा आहेत. तर टीडीपीच्या बाजूने २९ नगरसेवक आहेत, ज्यापैकी ३ हे त्यांचा सहकारी पक्ष जेएसपीचे आहेत. तर भाजपा, सीपीआय आणि सीपीआय (एम) या पक्षांचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे.

गेल्या जूनमध्ये टीडीपीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) राज्यात सत्तेत आली तेव्हा सुमारे २५ वायएसआरसीपी पक्षाचे नगरसेवक त्यांच्यात सामील झाले. एनडीए कडून आता दावा केला जात आहे की त्यांच्या बाजूने ६५ ते ७० नगरसेवक आहेत. अविश्वास प्रस्ताव जिंकण्यासाठी त्यांना ७४ मतांची आवश्यकता आहे.

“जेव्हा टीडीपी फ्लोअर लीडर, पी श्रीनिवास रान यांनी महापौरांवरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे, ज्यामध्ये ६९ नगरसेवकांच्या सह्या आहेत. आमच्याकडे जवळपास ७० नगरसेवकांचा पाठिंबा आहे आणि मदतानापूर्वी याहून जास्त पाठिंबा मिळेल आशी आशा आहे,” असे जेएसपी आमदार वामसी कृष्णा म्हणाले.

टीडीपीचे राज्य प्रमुख पल्ला श्रीनिवास राव यांनी स्पष्ट केले की पक्षाचे काही नगरसेवक हे मलेशियाला गेले आहेत. ते म्हणाले की, “सुमारे २६ सदस्य त्यांच्या कुटुंबियांसह क्वालालंपूर येथील विविध ठिकाणी गेले आहेत. आज ११ नगरसेवक गेले. आम्हाला अविश्वास प्रस्ताव जिंकण्याबद्दल विश्वास आहे.”

दरम्यान टीडीपीमधील एका सूत्राने सांगितले की, नगरसेवकांना उपलब्ध असलेल्या रिसॉर्ट्समध्ये खोल्या बुक करण्यास सांगण्यात आले होते आणि त्यांचा खर्च पक्षाच्या नेत्यांकडून उचलला जाईल असे आश्वासनही त्यांना देण्यात आले होते.

वायएसआरसीपी पक्षाकडे ३० ते ३४ नगरसेवक आहेत आणि टीडीपी त्यांना स्वतःकडे वळवून घेईल अशी भीती त्यांना आहे. क्रॉस वोटिंग रोखण्यासाठी वायआरएसने सुरूवातीला त्यांच्या नगरसेवकांना बंगळुरूच्या बाहेरील एका रिसॉर्टमध्ये हलवले होते मात्र नंतर या नेत्यांना श्रीलंका येथे हलवण्यात आले आहे.

नगरसेवक श्रीलंकेत

जीव्हीएमसीचे उपमहापौर जे श्रीधर यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की ते सध्या कोच्ची येथील एका रिसॉर्टमध्ये आहेत. “मी इतर सात वायएसआरसीपी नेत्यांबरोबर आहे. जवळपास ३० सदस्य हे श्रीलंकेत वेगवेगळ्या ठिकाणी गेले आहेत. मी त्यांचे लोकेशन उघड करू शकत नाही. सर्व वायएसआरसीपी नगरसेवक १९ एप्रिलला मतदान करणार नाहीत. आमच्यापैकी काही जण मतदानानंरच विझाग येथे परत येतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

विशाखापट्टणमवर नियंत्रण मिळवणे हा टीडीपीच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीसाठी मोठा विजय असेल. २०२४ च्या निवडणुकीत एनडीएने विशाखापट्टणममधील सर्व सातही जागा जिंकल्या होत्या तर टीडीपी नेते एम श्रीभारत यांनी विशाखापट्टणम लोकसभा मतदारसंघातून ५.४ लाख मतांनी विजय मिळवला होता.