२०२४ च्या निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपाने एनडीए युतीसाठी ४०० हून अधिकचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी पक्ष आपल्या मित्र पक्षांचा विस्तार करण्यात सातत्याने व्यस्त आहे. या मालिकेत आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी आणि पवन कल्याणच्या जेएसपीबरोबर भाजपाचा करार निश्चित करण्यात आला आहे. टीडीपी खासदार कनकमेडला रवींद्र कुमार यांनी तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) एनडीएमध्ये सामील होत असल्याचे सांगितले आहे. भाजपाने टीडीपी-जनसेनाबरोबर युती केली आहे. या युतीनंतर चंद्राबाबू नायडू म्हणाले की, युतीचा फायदा आंध्र प्रदेशला होणार आहे. भाजपा-टीडीपी एकत्र येणे ही देश आणि राज्यासाठी फायदेशीर बाब आहे. युतीबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांची भेट घेतली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर युतीची घोषणा करण्यात आली.

युतीची घोषणा संयुक्त निवेदनात केली

भाजप-टीडीपी आणि जेएसपी यांच्या युतीनंतर तिन्ही पक्षांनी संयुक्त निवेदन जारी केले आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी संयुक्त निवेदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी गेल्या १० वर्षांपासून देशाच्या प्रगतीसाठी अविरत काम करीत असल्याचे सांगण्यात आले. आता टीडीपी आणि जेएसपीदेखील यात सामील होतील आणि आंध्र प्रदेशातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यात मदत करतील. भाजपा आणि टीडीपीचे जुने नाते आहे. टीडीपी १९९६ मध्ये एनडीएमध्ये सामील झाली. त्यांनी २०१४ मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकार आणि त्यानंतर नरेंद्र मोदी सरकारमध्ये एकत्र काम केले. आता पुन्हा एकदा टीडीपी आणि भाजपा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढणार आहेत.

Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी माहिती
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “अरे गप्प बसा ना बाबा”, खाते वाटपाबाबत प्रश्न विचारताच अजित पवार संतापले
Dilip Walse Patil :
Dilip Walse Patil : “१५०० मतांनी निवडून आलोय अन् काय सांगू मला मंत्री करा?”, दिलीप वळसे पाटलांचं विधान चर्चेत
ajit pawar girish mahajan
“सुधरा, सुधरा, कधीतरी सुधरा, आताही कट…”, अजित पवारांची भरसभागृहात गिरीश महाजनांवर मिश्किल टिप्पणी!
Vishal Patil Sansad tv (1)
“पैसा झाला खोटा”, विशाल पाटलांनी महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणीं’ची व्यथा थेट संसदेत मांडली
Loksatta lalkilla Former Delhi Chief Minister Aam Aadmi Party Arvind Kejriwal Madhya Pradesh
लालकिल्ला: ‘रेवड्यांचा राजा’ काय करणार?

हेही वाचाः मावळमध्ये महाविकास आघाडीचे ठरले, महायुतीत अद्यापही अनिश्चितता

भाजपा ६, जेएसपी २, टीडीपी १७ असा हा फॉर्म्युला असणार

आंध्र प्रदेशात लोकसभेच्या एकूण २५ जागा आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जागावाटपाचा जो फॉर्म्युला ठरला आहे, त्यात भाजपा ६ जागांवर, जनसेना पक्ष २ जागांवर आणि टीडीपी १७ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. आंध्र प्रदेशात होणाऱ्या विधानसभेसाठी जागावाटपावरही चर्चा झाली आहे. राज्यात विधानसभेच्या १७५ जागा आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने १४५ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे भाजपा आणि जनसेना पक्षाला केवळ ३० जागा मिळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांमध्ये ३० जागांवर निर्णय झाला आहे.

हेही वाचाः भाजपला प्रादेशिक पक्षांच्या मैत्रीची आवश्यकता का भासू लागली?

लोकसभेसह विधानसभेवर लक्ष केंद्रित करणार

विझाग, विजयवाडा, अराकू, राजमपेट, राजमुंद्री, तिरुपती यासह काही प्रमुख मतदारसंघ राखण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. टीडीपी आणि जनसेना पक्षाच्या चर्चेतही हा मुद्दा पुढे आल्याचे मानले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत एकट्याने ३७० जागा जिंकण्यावर भाजपाचे लक्ष आहे. हे यश मिळवण्यासाठी प्रादेशिक पक्षांशी युती करणे महत्त्वाचे मानले जात आहे. यामुळेच आंध्र प्रदेश व्यतिरिक्त भाजपा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बीजेडीबरोबर निवडणूक युती करण्याची योजना आखत आहे.

TDP-BJP एकत्र का आले?

आंध्र प्रदेशात टीडीपीबरोबर भाजपा एकत्र येण्याचे महत्त्वाचे कारण आहे. खरे तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुकीत आपले वर्चस्व कायम राखायचे आहे. पाच वर्षांपूर्वी वायएसआर काँग्रेसने राज्यातील २५ लोकसभेच्या जागांपैकी २२ जागा आणि १७५ विधानसभा मतदारसंघांपैकी १५१ जागा जिंकण्यात यश मिळवले होते. याउलट भाजपाला मागील निवडणुकीत आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागला होता. कारण निवडणुकीच्या मैदानात भाजपा एकटा पडला होता. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेत एकही जागा जिंकण्यात पक्षाला यश आले नाही. मागील निवडणुकीच्या निकालातून धडा घेत पक्षाने यावेळी युतीसाठी वाटचाल केली आहे. एकेकाळी एनडीएचा भाग असलेला टीडीपी आता पुन्हा एनडीएमध्ये सामील झाला आहे. टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनाही आगामी निवडणुकीत या आघाडीचा फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

Story img Loader