चंद्रशेखर बोबडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेनेला (ठाकरे गट) सोडण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय काँग्रेस समर्थित शिक्षक संघटनासह आघाडीतील इतर घटक पक्षाशी संबधित शिक्षक संघटनांनाही आवडला नसून त्यांनी तो फेटाळून लावत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.
विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात ३० जानेवारीला निवडणूक होत आहे. यासाठी गुरूवार हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीत काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काँग्रेस उमेदवार देणार की काँग्रेस समर्थित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाला पाठिंबा देणार याबाबत उत्सूकता होती. दुसरीकडे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसला सहकार्य करणाऱ्या शिक्षक भारतीने काँग्रेसकडे पाठिंब्याची मागणी केली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे सांगून यातील उत्सूकता अधिक वाढवली होती. दरम्यान काँग्रेसच्या निर्णयाची वाट न पाहता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबोले व शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांनी त्यांचे अर्ज यापूर्वीच दाखल केले होते. बुधवारी मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली. त्यात नागपूरची जागा शिवसेनेसाठी(ठाकरे) सोडण्याचा निर्णय झाला. हा निर्णय काँग्रेससह या पक्षाकडून पाठिंबा अपेक्षित असणाऱ्या संघटनांसाठीही धक्कादायक ठरला. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या असून या संघटनांनी महाविकास आघाडी विशेषत: काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा… टी. चंद्रशेखर आता आंध्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते व माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे म्हणाले, काँग्रेसने पाठिंबा द्यावा,अशी आमची इच्छा होती. मात्र तो आता मिळणार नसल्याने आम्हाला काही फरक पडणार नाही, संघटनेने दोन वर्षापूर्वीच अडबोले यांना उमेदवारी दिली असून त्यांनी मतदारसंघ पिंजूनही काढला आहे. महाविकास आघाडीचा निर्णय काही असला तरी आम्ही रिंगणात कायम राहू व निवडणूक जिंकून दाखवू.
हेही वाचा… सांगलीत नियोजन समितीवरील सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या
शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे म्हणाले, काँग्रेसने आम्हाला पाठिंब्याचे आश्वासन दिले होते. ते पाळले गेले नाही. अलीकडे राजकारणात शब्द देणे व तो न पाळणे यालाच महत्व अेधिक हे.काँग्रेसचा पाठिंबा आम्ही मागितला असला तरी आम्ही त्या्ंच्या जोरावर निवडणूक लढवणा नव्हतोच. आमच्या संघटनेची ताकद पूर्व विदर्भात आहे, बुथ पातळीवर आमचे नियोजन झाले आहे. त्यामुळे आता माघार घेण्याचा प्रश्नच उरत नाही.
हेही वाचा… जळगाव भाजपच्या खासदार व आमदारामधील मतभेद चव्हाट्यावर
दरम्यान या सर्व प्रकरणात काँग्रेसची पंचाईत झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असल्याने काँग्रेसला शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागेल आणि कार्यकर्ते व नेते यांना हे शक्य होणार नाही कारण सेनेची ताकद या मतदारसंघात मर्यादित आहे.