कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असून भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी तारांकित प्रचारक नेत्यांची यादी जाहीर केली आहे. भाजपने या यादीतून तरुण फायरब्रॅण्ड नेते तेजस्वी सूर्या यांना तर, काँग्रेसने सचिन पायलट यांचा समावेश न करून अप्रत्यक्षपणे चपराक दिली आहे.

कर्नाटकमध्ये भाजप, काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) अशी तिहेरी लढत होणार असली तरी, दोन्ही राष्ट्रीय पक्षांमध्ये सत्तेसाठी तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. निवडणूक प्रचारामध्ये पक्षाचे नुकसान होऊ न देण्याची दक्षता दोन्ही पक्षांकडून घेतली जात आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा ४० दिग्गज नेत्यांचा तारांकित प्रचारक यादीमध्ये समावेश केला आहे. मात्र, या यादीत बेंगळुरू दक्षिणचे खासदार व भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्या नावाचा समावेश न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
Jayant Patil regret reaction on very small size of opposition
जिरवा जिरवीच्या राजकारणामुळे विरोधकांचा आकार एकदम छोटा, जयंत पाटलांकडून खंत
Loksatta lalkilla Congress BJP campaign AAP alleges corruption Sheila Dikshit
लालकिल्ला: काँग्रेसच्या खांद्यावर भाजपची मोहीम!
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Manoj Jarange Patil: “… तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

हेही वाचा – नगर शहरातील अशांततेवर राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रयत्न

कर्नाटकमध्ये नव्या पिढीकडे पक्षाचे नेतृत्व देण्याचा निर्णय घेतल्यामुळे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. कर्नाटकमधील तरुण नेतृत्वापैकी तेजस्वी सूर्या यांच्याकडे केंद्रीय नेतृत्व विशेषतः अमित शहा अत्यंत आशेने पाहात होते. ही विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याने सूर्या यांच्या आक्रमक भाषणांवर पक्ष अवलंबून असेल असे मानले जात होते. मात्र, अलिकडच्या काळात तेजस्वी सूर्या कामापेक्षा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले. शिवाय, उडत्या विमानामध्ये दार उघडण्याच्या प्रकारात सूर्या यांचेही नाव घेतले गेल्यामुळे ते अधिक वादग्रस्त ठरले. मुस्लिमांच्या प्रथा-परंपरांबद्दलही त्यांनी टिप्पणी केली होती.

सूर्या यांच्यासह येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांचाही प्रचारकांच्या यादीत समावेश केलेला नाही. सूर्या यांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघामधील प्रचारावर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे. विजयेंद्र हे शिकारीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्यामुळे त्यांना तिथे अधिक वेळ घालवावा लागणार आहे.

हेही वाचा – बी. एल. संतोष : कर्नाटक भाजपचे पडद्यामागील सूत्रधार

सध्या राजस्थान काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यातील मतभेद पुन्हा तीव्र झाले असून दोन्ही नेत्यांमध्ये मध्यस्थी करण्याची जबाबदारी प्रामुख्याने कमलनाथ यांच्यावर सोपवण्यात आली आहे. काँग्रेसच्या हायकमांडने गेहलोत यांच्या बाजूने वजन टाकले असल्याचे दिसू लागले आहे. कर्नाटकमधील निवडणुकीसाठी पक्षाने तारंकित प्रचारकांच्या यादीमध्ये सचिन पायलट यांचा समावेश केलेला नाही. जालंधरमधील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मात्र प्रचारकांच्या यादीत पायलट यांना स्थान देण्यात आले आहे. कर्नाटकसाठी अशोक गेहलोत हे तारांकित प्रचारक असतील. या यादीमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आदी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. पायलट यांना वगळून काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना अप्रत्यक्ष समज दिल्याचे मानले जाते. पायलट यांनी जयपूरमधील लाक्षणिक उपोषणावेळी खरगे वा गांधी कुटुंबातील सदस्यांची छायाचित्रे लावणे टाळले होते.

Story img Loader