तेलंगणा विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. येथे मतदारांना आकर्षित करण्यासाठी भारत राष्ट्र समिती (बीआरएस), काँग्रेस आणि भाजपा यांच्यात स्पर्धा लागली आहे. दलित, ओबीसी आणि मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने सहा महत्त्वाची आश्वासनं दिली आहेत. या आश्वासनांना पर्याय म्हणून आता बीआएस पक्षाने आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. यात कमी किमतीत गॅस सिलिंडर, महिलांना आर्थिक मदत, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ, गरिबांना घर अशा अनेक आश्वासनांचा समावेश आहे.

सत्तेत आल्यास गरिबांचा आरोग्य विमा

तेलंगणातील सत्ताधारी बीआरएस पक्षाने शितपत्रिका असणाऱ्या सर्वांनाच पाच किलो साध्या तांदळाऐवजी फोर्टिफाईड तांदूळ दिला जाईल. दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या कुटुंबांना पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा काढला जाईल, अशी आश्वासनं दिली आहेत. हा विमा केसीआर विमा योजनेअंतर्गत आयुर्विमा महामंडळातर्फे (LIC) काढला जाईल. या विम्याची रक्कम सरकार भरेल, असे आश्वासन बीआरएसच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
Five young women sold into prostitution with the lure of employment
नोकरीच्या आमिषाने कुंटणखान्यात पाच तरुणींची विक्री, गुन्हे शाखेकडून तरुणींची सुटका
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
Job Opportunity, Central Government Job, Job,
केंद्र सरकारच्या ‘या’ विभागांमध्ये नोकरीची संधी, २३ नोव्हेंबरपर्यंत…

विधवा, ज्येष्ठ नागरिकांना पाच हजार रुपये पेन्शन

ज्येष्ठ नागरिक, विधवा, विडी कामगार, एकल महिला, हातमाग कामगार यांच्या पेन्शनमध्ये पाच हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात येईल, असे आश्वासन केसीआर यांनी दिले. सध्या हे पेन्शन ३०१६ रुपये मिळते. दिव्यांगांना मिळणाऱ्या पेन्शनमध्येही वाढ करण्याचे आश्वासन बीआरएस पक्षाने दिले आहे. सध्या हे पेन्शन ४०१६ रुपये आहे. त्यात ६०१६ रुपयांपर्यंत वाढ करण्यात येईल, असे बीआरएसने म्हटले आहे. तेलंगणा सरकारतर्फे शेतकऱ्यांना प्रतिएकर १० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत १२ हजार रुपयांपर्यंत वाढवली जाईल, असेही आश्वासन बीआरएसने दिले आहे. भविष्यात ही मदत १६ हजार रुपयांपर्यंत वाढवली जाईल, असेही केसीआर म्हणाले आहेत. पात्र महिलांना प्रतिमहिना तीन हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. गॅस सिलिंडर ४०० रुपयांना दिले जाईल, असेही आश्वासन बीआरएसने तेलंगणाच्या जनतेला दिले आहे.

शहरी तसेच ग्रामीण भागातील गरिबांसाठी घरे बांधण्याचेही आश्वासन केसीआर यांनी दिले आहे. यासह महिलांच्या उत्थानासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना कार्यालयासाठी इमारत मिळेल असेही बीआरएसने आपल्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे.

काँग्रेसचा सामना करण्यासाठी बीआरएसची खास खेळी

याआधी काँग्रेसने तेलंगणाच्या जनतेला ५०० रुपयांत गॅस सिलिंडर देण्याचे तसेच शेतकऱ्यांना १२ हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांचा प्रभाव कमी व्हावा म्हणून बीआरएसनेही काँग्रेसप्रमाणेच आश्वासनं दिली आहेत. आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना केसीआर यांनी ‘तेलंगणा सरकारने राज्यातील विकास आणि कल्याणासाठी प्रत्येकाला समान संधी दिली आहे. तेलंगणा राज्य हे लोककल्याण आणि त्यासाठी करण्यात येणारा खर्च याबाबबीत संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरले आहे,’ असा दावा केला.

गरीब महिलांना तीन हजार रुपयांची आर्थिक मदत

केसीआर यांनी जाहीरनामा सार्वजनिक करताना महिलांच्या विकासासाठी देण्यात आलेल्या आश्वासनांचाही उल्लेख केला. बीआरएस पक्षाने महिलांच्या कल्याणाला नेहमीच प्राधान्य आणि महत्त्व दिलेले आहे, असे केसीआर म्हणाले. “मानवी दृष्टिकोन ठेवून आम्ही आणखी एक योजना सादर करत आहोत. बीआरएस पक्ष सत्तेत आल्यास राज्यातील गरीब महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल,” असे केसीआर म्हणाले.

सत्तेत आल्यास ४०० रुपयांना गॅस सिलिंडर देणार

घरगुती गॅस सिलिंडर अवघ्या ४०० रुपयांना देण्याचे आश्वासन बीआरएस पक्षाने दिले आहे. याबाबतही केसीआर यांनी सविस्तर सांगितले. “केंद्रातील भाजपा सरकारने गॅस सिलिंडरचे दर वाढवले आहेत. यामुळे देशातील सामान्य नागरिकाला अडचणींचा समना करावा लागत आहे. मानवी दृष्टिकोन ठेवून तसेच राज्यातील अनेक महिलांवरील ताण कमी व्हावा म्हणून आम्ही घरगुती गॅस सिलिंडर ४०० रुपयांना देणार आहोत. उर्वरित भार राज्य सरकार उचलेल”, असे केसीआर म्हणाले.

वंचित घटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासनं

काँग्रेस पक्षाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मुस्लीम मतदारांना लक्षात घेता अनेक आकर्षक आश्वासनं दिलेली आहेत. याच आश्वासनांचा जनतेवरील प्रभाव कमी व्हावा म्हणून बीआरएस पक्षानेदेखील समाजातील या वंचित घटकांच्या कल्याणासाठी वेगवेगळी आश्वासनं दिली आहेत. कर्नाटक राज्यात स्थानिक मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून काँग्रेसने विधानसभेची निवडणूक जिंकली होती. त्यामुळे तेलंगणा राज्यातही काँग्रेसने अशीच रणनीती आखली आहे. २०१८ साली काँग्रेस पक्षाला तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत अपयश आले होते. हे अपयश मागे टाकून काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीनिशी उतरला आहे. काँग्रेसच्या याच राणनीतीला तोंड देण्यासाठी बीआरएसने तेथील जनतेला अनेक आश्वासनं दिली आहेत. राज्यातील सरकार हे गरीब आणि शेतकऱ्यांचे कल्याण करणारे सरकार आहे, अशी प्रतिमा बीआरएसकडून निर्माण केली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.