तेलंगाणा राज्यात या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. याच कारणामुळे येथे मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. विद्यमान आमदार तसेच निवडणूक लढवण्यास इच्छुक असणारे नेते आपापल्या मतदारसंघात दौरे करताना दिसत आहेत. तर तेलंगाणामधील वेगवेगळ्या पक्षातील नेते आश्वासनं देऊन लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, तेलंगाणा काँग्रेसचे अध्यक्ष ए रेवांत रेड्डी यांनी येथील जनतेला मोठे आश्वासन दिले आहे. आम्ही सत्तेत आल्यास राज्यातील १०० मतदारसंघांमध्ये राम मंदिर उभारण्यावर विचार करू, असे रेड्डी म्हणाले आहेत. प्रत्येक मंदिर उभारण्यासाठी १० कोटींचा निधी दिला जाईल, असेही रेड्डी म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> नाराजीनाट्यानंतर बाळासाहेब थोरात-नाना पटोले यांची पहिल्यांदाच संयुक्त पत्रकार परिषद; म्हणाले, “आमच्यात…”
आम्ही यावर नक्कीच विचार करू
तेलंगाणामध्ये हात से हात जोडो यात्रा आयोजित करण्यात आली. ही यात्रा भद्राछलम येथे असताना ए रेवांत रेड्डी यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी बोलताना “भद्राछलम येथे राम मंदिर उभारण्यात आले. माझ्या पक्षातील नेत्यांनी मला सांगितले की राज्यातील १०० मतदारसंघांमध्ये राम मंदिर असायला हवे. आम्ही यावर नक्कीच विचार करू कारण हे तरुणांसाठी फायदेशीर ठरेल. त्यासाठी १००० कोटी रुपये खर्च करण्यावर विचार केला जाईल,” असे रेड्डी म्हणाले.
हेही वाचा >>> Tripura Election 2023: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; TIPRA Motha पक्षामुळे भाजपासमोर कडवे आव्हान
मोदी यांनी समाजात फूट पाडण्याचे काम केले
या वर्षी येथे विधानसभा निवडणूक होणार आहे. याच कारणामुळे रेड्डी यांच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. राम मंदिर उभारण्याचे आश्वासन देताना रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. “मोदी यांनी समाजात फूट पाडण्याचे काम केले. तर आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी समाजाला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला,” असे रेड्डी म्हणाले.
हेही वाचा >>> Nagaland Election : नागालँड जिंकण्यासाठी भाजपाने कंबर कसली, जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस
दरम्यान, काँग्रेस पक्षाने राम मंदिराबाबत घेतलेल्या या भूमिकेमुळे तेलंगाणामधील राजकारण तापण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या या आश्वासनानंतर भाजपा काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.