नोव्हेंबर महिन्यात पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्वच पक्ष तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. तेलंगणामध्येही भाजपा मतांचे गणित मांडण्यासाठी इतर पक्षांच्या कुबड्यांचा आधार घेण्याची शक्यता आहे. जनसेवा पक्षासह युतीची स्थिती स्पष्ट झालेली नसली तरी युतीसंदर्भात चर्चा-बैठका घेण्यात येत आहेत. जेएसपीचे प्रमुख व अभिनेते के. पवन कल्याण यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. जेएसपी आणि भाजपा यांच्यात युती आणि जागावाटपावरून चर्चा होण्याची शक्यता आहे.

भाजपाच्या सूत्रांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले, ”तेलंगणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना भाजपाच्या काही जागा जेएसपीला देण्यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे.” बुधवारी पवन कल्याण हे जेएसपीच्या राजकीय घडामोडी समितीचे अध्यक्ष नदेंदला मनोहर यांच्यासह दिल्लीला गेले होते; तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी हैदराबादला येणार आहेत.

Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
News BJP
BJP : भाजपा निवडणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष, कुठल्या खास निकषांवर होणार निवड?
Advay Hire , Malegaon Bazar Committee Chairman,
मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे अपात्र, शिवसेना ठाकरे गटाला धक्का
devendra fadnavis gadchiroli guardian minister
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना हवंय ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद; मित्रपक्षांनी सहमती दिल्यास जबाबदारी स्वीकारणार!

हेही वाचा: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शतकीय वाटचाल; नव्या गाण्याच्या माध्यमातून संघ काय दर्शवू पाहतो?

”असे काही मतदारसंघ आहेत, जिथे पवन कल्याण यांचा प्रभाव आहे. त्यांच्या आवाहनामुळे तेथील त्यांचा चाहता वर्ग जेएसपीला मतदान करू शकतो. आमच्यात याविषयी चर्चा झाल्या आहेत; पण अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही. गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ,” असे भाजपाच्या एका नेत्याने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

तेलंगणामध्ये भाजप आणि जेएसपीच्या नेत्यांमध्ये जागावाटपावर चर्चा होण्याची ही दुसरी वेळ आहे. पवन कल्याण यांनी मागील आठवड्यात किशन रेड्डी यांची भेट घेतली होती. त्यानंतर बुधवारी अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेतली. तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेश कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्यात अटक झाली. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी पवन कल्याण यांनी पुढील वर्षी होणाऱ्या आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याची घोषणा केली. कल्याण हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याविरोधात ‘महागठबंधन’ करीत आहेत; तसेच ते याकरिता भाजपामध्येही समाविष्ट होण्यास इच्छुक आहेत.

४ ऑक्टोबर रोजी पवन कल्याण यांनी जाहीर केल्यानुसार, ”जेएसपी तेलंगणातील ३२ विधानसभा मतदारसंघांत स्वबळावर लढेल.” त्यातील बहुसंख्य मतदारसंघ हे शहरी भागातील असून, हैदराबाद व आजूबाजूच्या परिसरातील आहेत. काही खम्मम व नलगोंडा या जिल्ह्यांतील आहेत. जेएसपी मुख्यत्वे हैदराबादमधील कुकटपल्ली, उप्पल, एलबी नगर, मलकाजगिरी, सेरिलिंगमपल्ली, पतनचेरू, कुतुबुल्लापूर व सनथनगर या मतदारसंघांत निवडणूक लढवणार आहे. जेएसपीने तेलंगणामध्ये पाच जागांवर २०१९ मधील लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु, जेएसपी आपले खातेदेखील उघडू शकली नाही. तेलंगणात जेएसपीचा राजकीय आधार फारच कमी असला तरी पक्षप्रमुख व अभिनेता पवन कल्याण याचा चाहतावर्ग मोठा आहे. भाजपाच्या एका सूत्राने सांगितल्यानुसार, जेएसपी आंध्र प्रदेशातील रहिवाशांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

Story img Loader