तिवसा

अमरावती : सलग तीन वेळा तिवसा मतदारसंघातून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी विजय मिळवल्यानंतर ही चौथी निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. गेल्या निवडणुकीतील शिवसेनेचे पराभूत उमेदवार राजेश वानखडे यांना यावेळी भाजपने मैदानात आणले आहे. लोकसभेतील विजयामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास दुणावला असला, तरी प्रस्थापित विरोधी मते रोखण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे.

nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

२००९ मध्ये यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकवून भाजपच्या वर्चस्वाला छेद दिला होता. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेतही यशोमती ठाकूर यांनी या ठिकाणी आपले वर्चस्व राखले. गेल्या निवडणुकीत त्यांनी तिसरा विजय संपादित केला. आता चौथ्यांदा मतदारसंघातील विकासकामांचा आराखडा मांडून त्या मतदारांना सामोऱ्या जात आहेत. गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. शिवसेनेचे राजेश वानखडे यांना १० हजार ३६१ मतांनी पराभव पत्करावा लागला. यंदाच्या निवडणुकीत वानखडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारीही मिळवली. भाजपच्या नेत्या नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी त्यांना बळ दिले आहे.

‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

सहकार क्षेत्रातील नेत्यांना यशोमती ठाकूर यांच्याविरोधात एकत्र आणून काँग्रेसच्या मतांचे विभाजन घडवून आणण्याचा राणा यांचा प्रयत्न आहे.

यशोमती ठाकूर यांनी गेल्या पाच वर्षांत ‘युवती संवाद’ मेळाव्याच्या माध्यमातून वाढवलेला जनसंपर्क त्यांच्यासाठी बलस्थान ठरला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना तिवसा मतदारसंघातून १० हजार ५७६ इतके मताधिक्य मिळाले. या मतदारसंघावरील काँग्रेसचे वर्चस्व यानिमित्ताने अधोरेखित झाले. बळवंत वानखडे यांच्या विजयामुळे यशोमती ठाकूर यांचे स्थान अधिक बळकट झाले असले, तरी त्यांचे विरोधक एकवटले आहेत.

लोकसभेतील राजकीय चित्र

महायुती ७४,२५९

महाविकास आघाडी ८५,२५९

निर्णायक मुद्दे

● कुणबी, माळी आणि मुस्लीम मतदारांची संख्या तुलनेने अधिक असली, तरी धनगर आणि तेली समाजाची मतेही मोठ्या संख्येने असल्याने हा मतदारसंघ बहुजातीय व बहुभाषिक असा आहे. संपूर्ण ग्रामीण असलेल्या या मतदारसंघात कुणबी आणि मुस्लीम मतदारांचा कौल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

● भाजपने या ठिकाणी हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. भाजपच्या उमेदवाराने शिवसेनेत असताना उभारलेल्या कार्यकर्त्यांच्या जाळ्याला छेद देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तर प्रस्थापित विरोधी मतांना आपल्याकडे खेचण्याची भाजपची धडपड यशस्वी होणार का, हा प्रश्न आहे.

Story img Loader