कोल्हापूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर दौऱ्यात कार्यकर्त्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्या सभा चर्चेत राहिल्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत बेरजेच्या राजकारणावर भर दिला.

राज्यात सत्तांतर होण्यापूर्वी संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. तेव्हाचे चित्र आणि आताचे चित्र यामध्ये मोठा फरक पडला आहे. राऊत यांनी शिवसेनेतून फुटलेल्या आजी- माजी लोकप्रतिनिधींवर टीका केली. खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके यांना त्यांनी टीकेचे लक्ष्य केले. राऊत यांच्या सभेच्या वेळी शिवसैनिकांची झालेली गर्दी आणि प्रतिसाद ही उल्लेखनीय होता. ‘ ५० खोके एकदम ओके ’ अशा घोषणा सातत्याने शिवसैनिकांकडून दिल्या जात होत्या. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल हाती आल्यामुळे तर राऊत यांच्या टीकेला धार आली.

Zakia Jafri passes away news in marathi
व्यक्तिवेध : झाकिया जाफरी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Congress leader Ravindra Dhangekar
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर ?
Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील
संजय राऊतांच्या विधानाने युतीच्या चर्चेला बळ
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
Sanjay Rathod , suicide case girl,
तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना दिलासा, फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका निकाली

हेही वाचा >>> ‘देशातील सर्वात भ्रष्ट सरकार’ अशी टीका करणारा भाजप संगमांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये सहभागी

वादग्रस्त विधाने

कोल्हापुरात आल्यापासून संजय राऊत यांनी वादग्रस्त विधाने करायला सुरुवात केली होती. ‘ डुप्लिकेट शिवसेनेचे हे विधिमंडळ नव्हे चोरमंडळ आहे ,’ या त्यांच्या पहिल्याच वाक्याने काहूर उठले. त्याचे पडसाद थेट विधिमंडळात उमटले. शिंदे गटावर टीकास्त्र सोडताना राऊत हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचाही आक्रमक शैलीत समाचार घेत राहिले. सातारा येथे छत्रपती घराण्यातील उदयनराजे- शिवेंद्रराजे भोसले यांच्यावरही त्यांनी टीका केली.

बेरजेच्या राजकारणावर भर

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी एकत्रितपणे लढण्याची हालचाली सुरू झाल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन राऊत यांचाही भर मित्र पक्षांबरोबर हातमिळवणी करण्यावर होता. श्रीमंत शाहू महाराज यांची याही दौऱ्यात त्यांनी भेट घेतली. प्रकाश आबिटकर शिवसेनेतून फुटले असल्याने राधानगरी – भुदरगड तालुक्यातील शिवसैनिकांचा त्यांच्यावर मोठा रोष आहे. ही बाब लक्षात घेऊन तेथील राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी राऊत यांची भेट महत्त्वपूर्ण ठरली. हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाटणीला गेला तर तेथून के. पी. पाटील शिवसेनेच्या चिन्हावर लढू शकतील अशा नव्या समीकरणाची शक्यता या भेटीनंतर व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांचे समर्थक जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख उपस्थित होते. शिरोळ तालुक्यात दत्त साखर कारखान्याला भेट देवून कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्याशी चर्चा केली.

Story img Loader