बदलापूर : स्वतःच्या जनसंपर्क आणि राजकीय डावपेचांच्या कलेवर स्वतःचा प्रभाव तयार करणारे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक खडतर असल्याची चर्चा रंगली आहे. स्वपक्षीय भाजपातून छुप्या कारवाया, महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मागण्या आणि भूमिका यामुळे कथोरे यांना यंदाची निवडणूक जड जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभा मतदारसंघ गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत येतो आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांनी दहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश केला. त्यावेळी जागा धोक्यात होती हे कारण नव्हते. कारण कथोरे यांची स्वतःची मोठी राजकीय ताकद मतदारसंघात आहे. मात्र तरीही त्यांनी भाजपचा पर्याय स्विकारला. त्यांच्याआधी कपिल पाटील यांनी भाजपात प्रवेश करत खासदारकीची निवडणूक जिंकली होती. दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांना थेट केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली आणि जिल्ह्यात तसेच मुरबाड विधानसभा मतदारसंघात संघर्षाला सुरूवात झाली. पाटील आणि कथोरे एकाच पक्षाचे असूनही एकमेकांना कोंडीत पडकण्याची संधी सोडत नव्हते. त्यात पाटील यांनी अनेकदा जाहीर वक्तव्ये करून कथोरे यांची कोंडी केली होती. माळशेजचा काचेच्या पुलाबाबतच उघड वक्तव्य, कथोरे यांच्या इतर मतदारसंघात दिल्या जाणाऱ्या निधीवरून थेट जिल्हा नियोजन समितीच्या बैठतीत आक्षेप घेणे असे अनेक प्रकार उघडकीस आले. त्यामुळे कथोरे आणि पाटील यांच्यातील दरी वाढत गेली. त्याचाच फटका पाटील यांना लोकसभा निवडणुकीत बसला. पाटील यांनी जाहिरपणे कथोरे यांना दोषी धरले. मध्यंतरीच्या काळात त्यांनी कथोरे यांच्याविरूद्ध निवडणुकीला उभे राहण्यापर्यंतची वक्तव्ये केली. काही दिवसांपूर्वी महायुतीच्या मेळाव्यात त्यांनी मवाळ भूमिका घेत पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे सांगत पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचेही सूतोवाच केले. मात्र या काळात पाटील आणि कथोरे समर्थकांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. त्याचा फटका कथोरे यांना बसण्याची भीती व्यक्त होते आहे.

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका

हेही वाचा >>>मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टिपथात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम एमएमआरडीए यांच्यात सामंजस्य करार

महायुतीतील पक्षांची अडचणीची भूमिका

मुरबाड विधानसभा मतदारसंघात महायुतीत असलेले मतभेद अनेकदा समोर आले. लोकसभा निवडणुकीपासून त्या मतभेदांमध्ये सातत्याने वाढ होते आहे. लोकसभेत तत्कालिन खासदार कपिल पाटील यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता संपर्क करण्याची सुरूवात केली होती. त्यामुळे वरिष्ठांमध्ये नाराजी होती. लोकसभेनंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले नसल्याची बाब समोर आली. ऐन मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेरच भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या होत्या. त्याच्या काही दिवसातच शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचीच मागणी केली. मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद असून कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात शिवसेना मोठा पक्ष आहे. त्यामुळे मुरबाड शिवसेनेला मिळावा अशी मागणी केल्याने शिवसेना आणि भाजपाच विसंवाद असल्याचे चित्र निर्माण झाले. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना फोडत शिवसेनेत प्रवेश दिला. त्यापूर्वी आमदार कथोरे यांच्या उपस्थितीत काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश झाला होता. त्यामुळे विसंवादाचे सत्र सुरूच राहिल्यास विधानसभेला त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त होते आहे.

हेही वाचा >>>शिंदे गटाकडून बुरखावाटप केल्याने वाद

कथोरेंची स्वतःची ताकद

आमदार किसन कथोरे यांच्या अडचणीत वाढ करण्यासाठी विरोधकांसह स्वपक्षीयही प्रयत्नात असले तरी कथोरे यांनी भाजप श्रेष्ठींशी आपले संबंध चांगले आणि अबाधित ठेवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचेही त्यांनी आमंत्रण होते. तसेच देवेंद्र फडणीवस यांच्यासह भाजपच्या नेत्यांसोबत त्यांचा मुक्त संवाद त्यांच्या जमेची बाजू आहे. स्थानिक पातळीवर कथोरे यांनी आपली स्वतःची पकड निर्माण केली आहे. त्यामुळे कथोरे यांची स्वतःची अनेक मते आहेत. जी निवडणुकीत निर्णायक ठरतात.

Story img Loader