नीलेश पानमंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मोठ्या बंडानंतरही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी कायम रहाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेला अखेर फुटीचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. पक्षाचा ग्रामीण भागातील मोठा चेहरा म्हणून ओळखले जाणारे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी शिंदे यांच्या बंडाला तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश पाटील आणि भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेश म्हात्रे या दोन नेत्यांवर शिवसेनेची ग्रामीण भागातील भिस्त होती. आदित्य ठाकरे यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी या दोघांनी घेतलेली मेहनत चर्चेचा विषय ठरली होती. असे असताना पाटील यांनी शिंदे गटाची साथ धरल्याने शिवसेनेला ग्रामीण भागात पक्ष बांधणीसाठी नव्याने मेहनत करावी लागणार आहे.

हेही वाचा <<< राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील कायम; जितेंद्र आव्हाड राष्ट्रीय पातळीवर

हेही वाचा <<< पंजाब सरकारला सहा महिने पूर्ण; भ्रष्टाचारापासून ते ऑडिओ क्लीपर्यंत ‘ही’ सहा प्रकरणं राहिली वादग्रस्त

शिवसेनेतून बंडखोरी करत राज्यात सत्ता स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागातील शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांकडून मोठे समर्थन मिळाले. आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर गेली दोन दशके शिंदे संपूर्ण जिल्ह्याचा कारभार पहात असत. त्यामुळे जिल्हा शिवसेनेत त्यांना मानणारा एक मोठा वर्ग तयार झाला आहे. असे असले तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकारी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे चित्र काल-परवापर्यंत दिसत होते. ग्रामीण भागातून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शिंदे यांच्या गोटातही अस्वस्थता होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचा शिंदे गटातील प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. ग्रामीण भागात भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा परिषद सदस्य, शहापूर नगरपरिषद सदस्य यांनी शिंदे यांना समर्थन दिले आहे. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शांताराम मोरे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिलेला असला तरी त्यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावणारे प्रकाश पाटील यांच्यासह ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे हे मात्र ठाकरे यांच्यासोबत असल्याचे चित्र होते. शिवसेनेतील बंडाळीनंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली असून ही यात्रा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि शहापूर भागात पार पडली. या यात्रेचे नियोजन या दोन्ही नेत्यांनी केले होते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये शहरी भागात शिवसेनेत उभी फूट पडली असली तरी ग्रामीण भागात मात्र शिवसेनेत मोठी फूट पडली नव्हती, असे चित्र होते. परंतु पाटील हे शिंदे गटात सामील झाल्यामुळे ग्रामीण भागातही सेनेला फुटीचे ग्रहण लागले असून जिल्ह्यात आता ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे आणि शहापूर भागातील उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे हे नेते शिल्लक राहिले आहेत. मध्यतरी भिवंडी ग्रामीणमध्ये वर्चस्व असलेले सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांनाही शिंदे गटात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा <<< ज्युनियर एनटीआर ते प्रभास; आंध्र प्रदेश, तेलंगणात ताकद वाढवण्यासाठी भाजपाला ‘स्टार पॉवर’ची मदत होणार का?

ग्रामीण भागात वर्चस्व

प्रकाश पाटील हे गेली १२ वर्षे शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुखपदी कार्यरत आहेत. ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य बँक असलेल्या गोपीनाथ पाटील पारसिक बँकेच्या उपाध्यक्षपदी देखील पाटील कार्यरत आहेत. पाटील यांचे ग्रामीण भागात मोठे वर्चस्व असून त्यांचा या भागात दबदबा आहे. प्रकाश पाटील यांचे विश्वासू भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे हे शिंदे गटात दाखल झाले, तेव्हापासून पाटील हे सुद्धा शिंदे गटात सामील होतील, अशी चर्चा होती. यातूनच वरिष्ठ नेत्यांसोबत खटके उडत असल्यामुळे त्यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देऊन फक्त शिवसैनिक म्हणून कार्यरत राहण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. ते शिंदे गटात सामील झाल्याने हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ठाकरेंकडे नेताच नाही

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे २१ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविली. जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून ते ओळखले जातात. जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत होते. शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते शिंदे गटात सामील झाले असले तरी ठाकरे यांच्या समर्थकांची मोठी संख्या जिल्ह्यात आहे; ते सर्वजण ठाणे लोकसभा क्षेत्रात पक्षाचे काम करताना दिसून येत आहेत. तर, शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील हेही शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांशी हितगुज किंवा चर्चा करण्यासाठी तसेच या कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी ठाकरे गटाकडे जिल्ह्याचा नेताच नसल्याचे चित्र दिसून येते.