ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात शिंदे पिता-पुत्र आणि त्यांच्या समर्थकांचा गेल्या काही काळापासून एकहाती प्रभाव पहायला मिळत असला तरी आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जात असताना उमेदवारांच्या निवडीपासून जागांच्या वाटपात भाजप अग्रेसर राहील याची काळजी पक्षाने घेतल्याचे पहायला मिळत आहे. उल्हासनगरात कुमार आयलानी यांचा अपवाद वगळला तर पक्षाने जिल्ह्यातील सात आमदारांना पुन्हा उमेदवारी देत असतानाच मिरा-भाईदरच्या अपक्ष आमदार गीता जैन स्वगृही कशा परततील यादृष्टीने मोर्चेबांधणी केल्याने जिल्ह्यातील १८ पैकी नऊ जागांवर भाजपचे उमेदवार रिंगणात असतील असे चित्र आता दिसू लागले आहे. विशेष म्हणजे, कल्याण पुर्व, ठाणे, मुरबाड, ऐरोली या मतदारसंघात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या कडव्या विरोधानंतरही भाजपने आपल्याला हवे तेच उमेदवार रिंगणात उतरवून यामध्येही शिंदेसेनेचा फारसा विचार केलेला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा