Shashi Tharoor And DK Shiv Kumar: हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपाने, दिल्ली विधानसभेतही तब्बल २६ वर्षांनी झेंडा फडकवला. महाकुंभमेळ्याचे यशस्वी आजोयन करून योगी आदित्यनाथ यांनीही उत्तर प्रदेशातील स्थान भक्कम केले आहे. पुढे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या बिहार निवडणुका पक्षासाठी आशादायक दिसत आहेत. अशात आता गेल्या आठवड्यापासून दक्षिणेकडील राज्ये राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार एकाच वेळी चर्चेत आल्याने दक्षिणेकडील राजकारणात मोठ्या हालचाही होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आजच्या परिस्थिती काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या राज्यांपैकी तीन राज्ये दक्षिणेकडील आहेत. यामध्ये कर्नाटक तेलंगणा आणि तमिळनाडूचा समावेश आहे. तमिळनाडूमध्ये डीएमके भोठ्या भावाच्या तर काँग्रेस लहान भावाच्या भूमिकेत आहे.

भाजपा गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिणेकडील राज्यात प्रवेश करण्याचे प्रयत्न करत आहे. परंतु आतापर्यंत या राज्यांनी भाजपाला विरोधच केला आहे. मात्र, २०२४ मध्येच भाजपाचा एनडीएतील मित्रपक्ष तेलुगू देसम पक्षाने आंध्र प्रदेशात पुन्हा सत्ता मिळवली आहे.

कायम कृतीतून बोलणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाशिवरात्रीच्या दिवशी काँग्रेस नेते व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार आणि सद्गुरु जग्गी वाउसदेव यांच्याबरोबर कोइम्बतूरमधील ईशा योग केंद्रात एकाच व्यासपीठावर होते. शहा प्रयागराजला जाण्याचा पर्याय निवडू शकले असते जिथे महाकुंभची सांगता होणार होती. परंतु, त्याऐवजी त्यांनी कोइम्बतूरमध्ये जाण्याचा पर्याय निवडला.

शशी थरूर प्रकरण

द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शशी थरूर यांनी दावा केला होता की, “एका खासगी कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, केरळमध्ये नेतृत्वाच्या बाबतीत ते इतरांपेक्षा पुढे आहेत. जर पक्षाला त्याचा वापर करायचा असेल तर मी पक्षासाठी उपस्थित असेन. जर नसेल तर मला करण्यासारख्या इतर अनेक गोष्टी आहेत.” ते पुढे म्हणाले की, “तुम्ही असे समजू नका की की माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. माझ्याकडे माझी पुस्तके, भाषणे, जगभरातून भाषण देण्यासाठी येणारे आमंत्रणे आहेत.” दरम्यान शशी थरूर यांच्या या विधानानंतर ते काँग्रेस सोडणार असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून गेले आहेत. त्यावेळी त्यांना थांबवण्यासाठी राहुल गांधींनी जास्त प्रयत्न कले नाही. परंतु, शरूर यांच्या बाबतीत कोणताही विलंब न करता राहुल गांधी थरूर यांना भेटले. त्यानंतर लगेचच, २०२६ च्या विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी पक्षाच्या केरळच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. ज्यामध्ये खासदार थरूरही उपस्थित होते. दरम्यान थरूर यांनी स्पष्ट केले की ते भाजपा किंवा इतर कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. असे असले तरी, थरूर प्रकरणामुळे पक्षाचे वातावरण बिघडू नये असे काँग्रेसला वाटत आहे.

डी. के. शिवकुमार

शशी थरूर यांच्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस नेतृत्वावर आपला राग व्यक्त केला. ते शिवरात्रीच्या उत्सवात कोइम्बतूरजवळील ईशा योग केंद्रात जग्गी वासुदेव यांच्या शेजारी बसले, जिथे अमित शहा देखील उपस्थित होते. वासुदेव आणि गृहमंत्री दोघांनीही राहुल गांधींची वारंवार खिल्ली उडवल्यामुळे, कर्नाटक काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवकुमार यांनी वासुदेव यांचे उघडपणे कौतुक केले आणि म्हटले, “मी जिथे माझा श्रद्धा आहे तिथे जातो.” त्यांनी महाकुंभाच्या वेळी संगमात स्नानही केले आणि “मी हिंदू म्हणून जन्मलो आणि हिंदू म्हणूनच मरेन” अशी घोषणाही दिली. असे करताना त्यांना अजिबात संकोच वाटला नाही.

शिवकुमार, यांचा वोक्कालिगा समुदायात मोठा प्रभाव आहे, ते भविष्य लक्षात घेऊन त्याचे राजकीय व्यक्तिमत्वाचे “हिंदूकरण” करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवकुमार यांना काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्रीपदाचे स्पष्टपणे आश्वासन दिले गेले असेल किंवा नसेल, परंतु त्यांना हे माहित आहे की यामुळे काँग्रेस सरकार पडू शकते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पदावरून काढले तर ते बंड करतील.

भाजपाचं मनोरंजन

सध्या काँग्रेसने केरळ आणि कर्नाटकमध्ये झालेल्या घटनांचे डॅमेज कंट्रोल केले असले तरी काही प्रमणात पक्षाचे नुकसान झाले आहे. थरूर आणि शिवकुमार यांच्या विधानांमुळे काँग्रेसमध्ये गटबाजी चालत असून, राष्ट्रीय नेतृत्व आपल्या वरिष्ठ नेत्यांना नियंत्रणात ठेवू शकत नाही, अशी भावना अधिकच तीव्र होत आहे. यामुळे भाजपला नक्कीच हसू आले असेल.

Live Updates

Story img Loader