पुणे : गटबाजीने पोखरलेल्या पुणे शहर काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्यासाठी चर्चेचा बेत आखण्यात आला. मात्र, ही चर्चाच झाली नाही. त्याचे पडसाद पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी घेतलेल्या आढावा बैठकीतही उमटले. एकाच व्यासपीठावर बसून एकमेकांची तोंडे न बघता झालेल्या या बैठकीचे फलित काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुभंगलेली मने जोडायची कशी, या विवंचनेत सापडलेल्या पुणे काँग्रेसपुढे आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही गटांना एकसंघ बांधणारा उमेदवार आणायचा कुठून, असा गहन प्रश्न पुढे उभा राहिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गट- तट बाजूला ठेवून सर्वांनी एकदिलाने काम करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुढाकार घेतला. त्यांनी ही जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्यावर सोपवली. त्यानुसार उल्हास पवार यांनी स्नेहभोजनाचा बेत आखला. या स्नेहभोजनात ‘टेबल पर चर्चा’ करून मनोमिलन करण्याचेही ठरवण्यात आले. पश्चिम महाराष्ट्राच्या आढावा बैठकीपूर्वीच सर्वांनी एक दिलाने कामाला लागण्याचेही ठरवण्यात आले. मात्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम झालाच नाही. त्याचे प्रतिबिंब आढावा बैठकीतून उमटले. आढावा बैठकीत पुणे शहरातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी एकाच व्यासपीठावर बसून होते. मात्र, कोणी एकमेकांकडे बघतही नव्हते. त्यातून गटबाजीचे जाहीर प्रदर्शन उपस्थितांना पहावयास मिळाले.
या बैठकीला काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे आदी ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. पुणे शहर काँग्रेसमधील गटबाजी नेतेमंडळींना अनुभवायला मिळाली. त्यामुळे मनोमिलन कसे घडवायचे, हेच मोठे आव्हान काँग्रेसपुढे उभे राहिले आहे.
उमेदवार आणायचा कोठून?
माजी मंत्री रमेश बागवे यांना शहराध्यक्ष पदावरून पायउतार करून प्रभारी शहराध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांची शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आल्यानंतर गटबाजीला सुरुवात झाली. बागवे, माजी आमदार मोहन जोशी, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर हा एक गट सक्रिय आहे, तर दुसरीकडे अरविंद शिंदे यांना मानणारा दुसरा गट आहे. दोन्ही गट हे वेगवेगळे कार्यक्रम आणि आंदोलनेही वेगवेगळी करत असतात. त्यामुळे काँग्रेमधील दुफळी वाढतच चालली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार निश्चित करायचा आहे. त्यासाठी आतापर्यंत वीस इच्छुकांनी अर्ज दिले आहेत. त्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण केले जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले आहे. या दोन्ही गटांना एकसंघ बांधणारा उमेदवार आणायचा कोठून, हेच काँग्रेसपुढील प्रमुख आव्हान उभे राहिले आहे.
हेही वाचा – जातीच्या आधारावर मतदान होणारा मतदारसंघ, महायुतीत प्रफुल्ल पटेल की भाजप ?
विश्वजीत कदम यांच्या भूमिकेकडे लक्ष
काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून आमदार विश्वजीत कदम यांची नेमणूक केली आहे. कदम यांनी २०१४ मध्ये या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला होता. भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांनी कदम यांचा तब्बल तीन लाख पंधरा हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. तेव्हाही काँग्रेसअंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसला होता. त्यामुळे निरीक्षक म्हणून कदम हे दोन्ही गटांना एकत्र कसे आणणार, त्यासाठी कोणती भूमिका बजावणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.