मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने निर्णय घेण्यासाठी महायुती सरकारची लगीनघाई सुरू असताना प्रशासनाकडून मात्र चालढकल सुरू असल्याची तक्रार काही मंत्र्यांनी सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्यावर अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

विधानसभा निवडणुकीसाठी समाजाताली सर्व घटकांना खूष करणाऱ्या निर्णयांचा महायुती सरकारने सपाटा लावला असून आजच्या बैठकीत ३० पेक्षा अधिक निर्णय घेण्यात आले. एकीकडे मंत्री झटापट निर्णय घेत असताना काही अधिकारी मात्र फाईलींवर निर्णयच घेत नाही. निर्णय घेत नाहीत, स्वाक्षरी करीत नाहीत अशी नाराजी काही मंत्र्यांनी व्यक्त केली. आचारसंहिता लागण्यात पंधरा दिवस शिल्लक आहेत. तोवर चालढकल करू अशा भावनेतून काही अधिकारी वागत असून आपण सही केल्यानंतरही प्रस्ताव पुढे जात नाहीत. मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव येण्यास विलंब लावला जात असल्याची नाराजी काही मंत्र्यांनी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. यावेळी दूध दरवाढीवरूनही काही मंत्र्यांमध्ये वाद झाला.

Who is BJP face for Delhi poll campaign Smriti Irani
Smriti Irani for Delhi CM: अमेठीत पराभव आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार, भाजपा दिल्लीची सूत्रे स्मृती इराणींच्या हाती देणार?
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
mahayuti will contest assembly elections under the leadership of cm eknath shinde says ajit pawar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक; अजित पवार यांची माहिती
Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
Eknath Shinde announcement in the meeting of government officers employees organizations regarding pension
निवृत्तिवेतनासाठी सर्व पर्याय खुले; शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा
Mamata Banerjee is aggressive in the Assembly on the safety of women
विधेयकाच्या आडून भाजप लक्ष्य, विधानसभेत ममता बॅनर्जी आक्रमक; प. बंगालमध्ये ‘अपराजिता’ कायदा
Pratap Chikhalikar, Nanded by-election,
नांदेड पोटनिवडणूक लढण्यास प्रताप चिखलीकर पुन्हा इच्छुक

हेही वाचा >>>Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त निवडणुकीच्या मैदानात उतरणार? कोण आहेत संजय पांडे?

गायीच्या दूध दराच्या अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडला असता, आता अनुदानात वाढ करण्याची घाई कशाला. तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याची तक्रार अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. त्यावर हा निर्णय आधीचाच असून त्यात केवळ दोन रुपयांची वाढ असल्याचे सांगत या वादावर पडदा टाकण्यात आला.