लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप ठरत असतानाच शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या विद्यामान आमदारांची बैठक मातोश्रीवर पार पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे शिवसेनेच्या विद्यामान १५ आमदारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. लवकरच या आमदारांना ‘एबी फॉर्म’चे वाटप केले जाणार आहे.

Navneet Rana On Uddhav Thackeray :
Navneet Rana : प्रचार सभेत झालेल्या राड्यानंतर नवनीत राणांचा ठाकरे गटावर हल्लाबोल; म्हणाल्या, “उद्धव ठाकरे आता जनाब…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mitali Thackeray on womens public toilets
Mitali Thackeray : प्रचारादरम्यान मिताली ठाकरेंना काय जाणवलं? म्हणाल्या, “महिलांशी कनेक्ट झाल्यावर…”
ramdas Athawale raj Thackeray
राज ठाकरेंना महायुतीत यायचे असेल तर आधी…आठवलेंनी सांगितला भविष्यातला प्लॅन…
Aditya Thackeray vidhan sabha
वरळीतील ठाकरे गटाच्या प्रचाराची भिस्त तीन आमदार, दोन माजी महापौर, माजी उपमहापौरांवर
Sharmila Thackeray Thane, Sharmila Thackeray,
महिलांना पंधराशे रुपये देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्या – शर्मिला ठाकरे
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?

शिवसेना (ठाकरे) पक्षाची तातडीची बैठक गुरुवारी मातोश्री निवासस्थानी पार पडली. विधानसभेसाठी २२ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. त्यापार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली होती. आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, खासदार अनिल देसाई यांनी या सर्व आमदारांना मार्गदर्शन करीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच या सर्व आमदारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे दिले. राज्यातील इतर मतदारसंघांचा आढावा घेतला जात असून लवकरच उर्वरित उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी दिली. तसेच सर्व उमेदवारांना लवकरच एबी फॉर्म देणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.