लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप ठरत असतानाच शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या विद्यामान आमदारांची बैठक मातोश्रीवर पार पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे शिवसेनेच्या विद्यामान १५ आमदारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. लवकरच या आमदारांना ‘एबी फॉर्म’चे वाटप केले जाणार आहे.
शिवसेना (ठाकरे) पक्षाची तातडीची बैठक गुरुवारी मातोश्री निवासस्थानी पार पडली. विधानसभेसाठी २२ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. त्यापार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली होती. आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, खासदार अनिल देसाई यांनी या सर्व आमदारांना मार्गदर्शन करीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच या सर्व आमदारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे दिले. राज्यातील इतर मतदारसंघांचा आढावा घेतला जात असून लवकरच उर्वरित उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी दिली. तसेच सर्व उमेदवारांना लवकरच एबी फॉर्म देणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.